संरक्षण मंत्रालय

संरक्षणमंत्र्यांनी ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांसोबत लंडनमध्ये ब्रिटन -भारत संरक्षण उद्योगातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिषदेचे भूषवले सह-अध्यक्षपद

Posted On: 10 JAN 2024 8:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 10 जानेवारी 2024

ब्रिटन  दौऱ्याच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी  10 जानेवारी 2024 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लंडनमधील ट्रिनिटी हाऊस येथे एका कार्यक्रमात ब्रिटनच्या  संरक्षण उद्योगातील अग्रगण्य धुरिणी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ब्रिटनचे संरक्षणमंत्र्यांसोबत  ग्रँट शॅप्स यांच्यासमवेत सह-अध्यक्षपद भूषविले. ब्रिटन -भारत संरक्षण उद्योगातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिषदेत ब्रिटन मधील संरक्षण उद्योगातील सीईओसंरक्षण मंत्रालयाचे अधिकारी; अध्यक्ष, ब्रिटन - भारत उद्योग परिषद; आणि सीआयआय इंडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत, संरक्षण मंत्र्यांनी ब्रिटनमधील गुंतवणूक आणि तंत्रज्ञान सहकार्याचे स्वागत केले आणि सांगितले की भारत कुशल मनुष्यबळ, मजबूत थेट परदेशी गुंतवणूक आणि उद्योग परिसंस्था उभारण्यासाठी  मोठ्या देशांतर्गत बाजारपेठेसह सज्ज आहे.

भारत-ब्रिटन संबंधांचे महत्त्व अधोरेखित करताना, संरक्षण मंत्री म्हणाले की उभय देशात सहकार्यात्मक  संबंध आहेत आणि भारत सरकारचा  ब्रिटन  सह सहकार्य, सह-निर्मिती आणि सह-नवोन्मेषासाठी समृद्ध भागीदारीचा दृष्टिकोन आहे.  ते म्हणाले, आपल्या राष्ट्रांच्या सामर्थ्यांचा समन्वय साधून, आपण एकत्रितपणे अनेक गोष्टी साध्य करू शकतो.

ग्रँट शॅप्स यांनी भारत आणि ब्रिटन यांच्यातील  संबंधांबाबत राजनाथ सिंह यांच्या विधानाशी सहमती दर्शवली. हे संबंध सामान्य खरेदीदार-विक्रेता संबंधांच्या पलीकडे असून मूलभूतपणे एक धोरणात्मक भागीदारी आहे असेही  ग्रँट शॅप्स यांनी सांगितले.

संरक्षण मंत्री आज ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि  परराष्ट्र सचिव (परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास व्यवहार सचिव) डेव्हिड कॅमेरून यांची भेट घेणार आहेत.

S.Kane/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1994984) Visitor Counter : 79


Read this release in: English , Urdu , Hindi