वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पीएम गतिशक्ती अभियानांतर्गत 63 व्या नेटवर्क नियोजन गटाच्या बैठकीत 3 पायाभूत सुविधा प्रकल्पांवर झाली चर्चा
Posted On:
06 JAN 2024 10:01AM by PIB Mumbai
63 वी नेटवर्क नियोजन गटाची (एनजीपी) बैठक 4 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथील वाणिज्य भवन येथे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआयआयटी) विशेष सचिव (लॉजिस्टिक्स) सुमिता डावरा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रमुख मंत्रालये आणि विभागांचा सक्रिय सहभाग दिसून आला, ज्यामध्ये रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (एमओआरटीएच), नागरी विमान वाहतूक मंत्रालय (एमओसीए) रेल्वे मंत्रालय (एमओआर), बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय (एमओपीएसडब्ल्यू) दूरसंचार विभाग (डीओटी), नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (एमएनआरइ), ऊर्जा मंत्रालय (एमओपी), संरक्षण मंत्रालय आणि नीती आयोग आयोग यांचा समावेश होता.
या बैठकीदरम्यान नेटवर्क नियोजन गटाने (एनजीपी) रेल्वे मंत्रालयाच्या (1) आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (2) संबंधित तीन प्रकल्पांवर चर्चा केली. या एकूण तीन प्रकल्पांचा खर्च 5000 कोटींपेक्षा जास्त असणार आहे. यामध्ये ओडिशा आणि छत्तीसगड राज्यांमधून जाणाऱ्या नवीन रेल्वे मार्गिका प्रकल्पाचा समावेश आहे.
हे मान्य करण्यात आले की गतिशक्ती नियोजन उपक्रमामागील प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे देशातील गर्दी होणाऱ्या म्हणजेच गजबजलेल्या भागांना धोरणात्मकदृष्ट्या बायपास मार्ग उपलब्ध करून त्यांना महत्त्वाच्या औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्रांशी जोडणे आणि त्यांची मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी वाढवणे.
या वेळी नेटवर्क नियोजन गटाद्वारे मिर्झापूर-अयोध्या कॉरिडॉरची तपासणी देखील करण्यात आली आणि त्यामध्ये दाट लोकवस्ती असलेल्या प्रदेशातील या दोन महत्त्वाच्या शहरांसाठीच्या बायपास रस्त्यांच्या बांधकामाचा समावेश करण्यात आला.
नेटवर्क नियोजन गटाच्या बैठकीत चर्चा करण्यात आलेला आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे आंध्र प्रदेशमधील मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क (एमएमएलपी)विकसित करणे.
यावेळी विशेष सचिवांनी नमूद केले की, या प्रकल्पामुळे विविध मार्गाने होणाऱ्या वाहतुकीच्या समस्या एकत्रितपणे हाताळल्या जातील तसेच या प्रकल्पामुळे भरीव सामाजिक-आर्थिक फायदे होणार असून यामुळे या प्रदेशांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागेल.
***
JPS/VPY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1993727)
Visitor Counter : 127