वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024" चे बोधचिन्ह आणि पुस्तिकेचे केंद्रीय  मंत्री पीयूष गोयल यांनी केले अनावरण


वाहन उद्योगाला निर्यातीचा 50% वाटा साध्य करण्याचे गोयल यांचे आवाहन

मेगा प्रदर्शनांमुळे जागतिक बाजारपेठेत भारताच्या ताकदीचे दर्शन घडण्याबरोबरच उद्योगांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला  स्थान मिळते : गोयल

Posted On: 05 JAN 2024 6:04PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार मंत्रीपीयूष गोयल यांनी भव्य  गतिशीलता प्रदर्शन,  "भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024" च्या बोधचिन्हाचे  आणि पुस्तिकेचे आज नवी दिल्ली येथे अनावरण केले. या  महा गतिशीलता प्रदर्शनाच्या उद्घाटनपूर्व  कार्यक्रमाला संबोधित करतानागोयल  म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या संपूर्ण-सरकारी दृष्टिकोनामुळे भारताला नाविन्यपूर्ण विचार आणि सर्वांगीण कार्यपद्धतीच्या नवीन युगात नेले आहे.

पीयूष गोयल यांनी वाहन उद्योगाला 25% निर्यात  हिस्सा मिळवण्यापुरते मर्यादित न ठेवता आता किमान 50% निर्यात वाटा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन केले.

या अतिभव्य  प्रदर्शनांचे महत्त्व  गोयल यांनी यावेळी  अधोरेखित केले आणि प्रदर्शनाचा  आंतरराष्ट्रीय स्तर आणि देशाच्या महत्त्वाकांक्षा याचा उल्लेख केला. भारताचे सामर्थ्य जागतिक बाजारपेठेत सादर करणे आणि देशाला उद्योगांमध्ये आंतरराष्ट्रीय मातब्बर म्हणून स्थापन करणे, हे प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. जागतिक निर्यातीत आपला वाटा लक्षणीयरीत्या वाढवण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेवर भर देत उद्योगांना जागतिक स्तरावर अधिक उत्कृष्ट आणि विक्रमी कामगिरीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024” हा प्रतिष्ठित, महत्वाचा  कार्यक्रम 1-3 फेब्रुवारी, 2024 दरम्यान होणार आहे. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरील अत्याधुनिक, जागतिक दर्जाच्या भारत मंडपम, येथे हे प्रदर्शन 1,00,000 पेक्षा अध्कि  चौरस  मीटर क्षेत्रफळामध्‍ये आयोजित केले जाणार आहे.

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 हा मोबिलिटी  क्षेत्रातील सहयोग आणि नावीन्यपूर्ण नवीन पर्वाचा शुभारंभ करणारी ऐतिहासिक घटना आहे.  या प्रदर्शनामध्‍ये  50 पेक्षा जास्त  देशांतील 600 हून अधिक प्रदर्शक आपले उत्पादन मांडणार आहेत.  हे प्रदर्शन  अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि गतिशीलतेतील प्रगतीवर प्रकाश टाकणार आहे.  या कार्यक्रमामध्ये 13हून अधिक  परिषदांचे आयोजन केले आहे.  प्रत्येक गतिशीलता  मूल्य साखळीच्या  विविध पैलूंना समर्पित, जगभरातील तज्ञांचा  सहभाग या विशाल प्रदर्शनामध्ये असणार आहे.

आघाडीचे 27 हून अधिक वाहन उत्पादक आपली नवीन मॉडेल्स आणि इलेक्ट्रिक वाहनांचे अनावरण करण्यासाठी सज्ज आहेत. यामुळे  ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या नाविन्यपूर्णतेविषयीच्या   दृढ वचनबद्धतेचे   प्रदर्शन घडते.

प्रदर्शनामध्‍ये जपान, जर्मनी, कोरिया, तैवान आणि थायलंड यांसारख्या देशांना समर्पित मंडप असतील   तर अमेरिका , स्पेन, संयुक्त अरब अमिरात , रशिया, इटली, तुर्कीए, सिंगापूर आणि बेल्जियम या देशांचा अतिरिक्त आंतरराष्ट्रीय सहभाग असेल. एसीएमएचे विशिष्‍ट ओळख असलेले  आफ्टरमार्केटप्रदर्शन , एसीएमए  ऑटोमेकॅनिका नवी दिल्ली, आता भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024’  चा भाग म्हणून प्रदर्शित केले  जाणार आहे.

या कार्यक्रमात प्रमुख आंतरराष्ट्रीय आणि भारतीय बॅटरी उत्पादक आणि बॅटरी पुरवठा साखळी  आणि पुनर्वापर करणा-या  कंपन्यांचाही मोठा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमादरम्यान 10 हून अधिक आघाडीच्या कंपन्या चार्जिंग स्टेशन्स आणि बॅटरी स्वॅपिंग सोल्यूशन्ससह ईव्हीसाठी  पायाभूत सुविधांचे प्रदर्शन करतील.

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 बद्दल अधिक माहिती www.bharat-mobility.com  वर उपलब्ध आहे.

***

N.Chitale/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1993650) Visitor Counter : 139


Read this release in: English , Urdu , Hindi