नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
नवीन धोरणात्मक क्षेत्रे आणि भौगोलिक क्षेत्रांमध्ये भविष्यातील मार्गदर्शक आराखडा चिन्हांकित करण्यासाठी भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्था (ईरेडा ) वर्ष 2024 ला 'मनुष्यबळ विकास आणि अनुशासन वर्ष' असे नाव देणार : ईरेडाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
Posted On:
02 JAN 2024 9:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2024
नवीन वर्ष 2024 च्या निमित्ताने, नवीन धोरणात्मक क्षेत्रे आणि भौगोलिक क्षेत्रांमध्ये भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेचा (ईरेडा) भविष्यातील मार्गदर्शक आराखडा चिन्हांकित करण्यासाठी 2024 हे वर्ष 'मनुष्यबळ विकास आणि अनुशासन वर्ष' म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा ईरेडाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी केली आहे.
ईरेडाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी ईरेडाच्या कर्मचार्यांना शुभेच्छा दिल्या आणि ईरेडाच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्याने सामूहिक प्रयत्नांबद्दल प्रशंसा केली. निरंतर यश आणि कामगिरीने भरलेल्या वर्षासाठी ईरेडाला नव्या उंचीवर नेले आहे, असे ते म्हणाले.
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांसह संचालक (वित्त) बिजय कुमार मोहंती; मुख्य दक्षता अधिकारी, अजय कुमार सहानी आणि इतर वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी यावेळी उपस्थित होते.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1992548)
Visitor Counter : 142