अर्थ मंत्रालय

दिनांक 19.03.2024 रोजी कस्टम्स ब्रोकर परवाना परीक्षा, 2024 होणार

Posted On: 01 JAN 2024 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2024

 

कस्टम्स ब्रोकर परवाना परीक्षा 2024, चे आयोजन 19 मार्च 2024 रोजी होणार आहे. कस्टम्स ब्रोकर परवाना परीक्षा 2024 च्या ऑनलाईन लेखी परीक्षेबाबत माहिती मिळवण्यासाठी कृपया दिनांक 28.08.2023 रोजी राष्ट्रीय वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात बघावी. लेखी आणि तोंडी परीक्षा खालील पद्धतीने घेण्यात येईल.

बहुपर्यायी प्रश्न असलेली संगणकाधारित परीक्षा असे लेखी परीक्षेचे स्वरूप असेल. ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये घेण्यात येईल. उमेदवारांना इंगजी अथवा हिंदी यापैकी एका भाषेत उत्तरे देण्याचा पर्याय उपलब्ध असेल. या परीक्षेचे इतर तपशील पुढीलप्रमाणे आहेत:

प्रश्नांची संख्या                         :          150

कालावधी                             :          अडीच तास (सकाळी 10.30 ते दुपारी 1.00)

गुणांकन पद्धत                       :          प्रत्येक योग्य उत्तरासाठी 3 अधिक गुण

                                                    प्रत्येक अयोग्य उत्तरासाठी उणे 1 गुण 

कमाल गुण                           :          450

उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण :         270 (60%)

लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कस्टम्स ब्रोकर परवाना नियम,2018 मधील नियम क्र.6 मध्ये सुधारणा केल्यानुसार तोंडी परीक्षा द्यावी लागेल. तोंडी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 60% गुण मिळवणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया संकेतस्थळाला (www.cbic.gov.in and www.nacin.gov.in) भेट द्या अथवा जवळच्या सीमाशुल्क आयुक्तालय किंवा एनएसीआयएन, फरीदाबाद येथे ईमेलद्वारे संपर्क साधा.

ईमेल आयडी: nacin.cblr@icegate.gov.in

 

* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1992212) Visitor Counter : 147