विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
मशरूममध्ये (अळंबी) असलेल्या जैव सक्रिय घटकांमध्ये कोविड -19 आणि इतर विषाणूजन्य संसर्गाचा सामना करण्याची क्षमता
Posted On:
29 DEC 2023 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2023
सहजतेने मिळणाऱ्या मशरूमच्या विस्तृत श्रेणीतून नैसर्गिक संसर्गविरोधी, विषाणूविरोधी ,दाह-विरोधी आणि अँटीथ्रोम्बोटिक घटकांचा म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या कमी करण्याचा सामना करण्याची क्षमता आहे, असे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे.
कोविड-19 महामारीने रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या जैव सक्रिय घटकांवर लक्ष केंद्रित केले. परिणामी, जगभरातील शास्त्रज्ञांनी जैव सक्रिय संयुगांवर सखोल अभ्यास पुन्हा सुरू केला ज्यामुळे सार्स -सीओव्ही -2 पासून संरक्षण करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते आणि या विषाणूचा वेगवान प्रसार मर्यादित होतो. परिणामी,मशरूमची सहज उपलब्धता, उच्च अँटिऑक्सिडंट गुणधर्म , पौष्टिक मूल्य आणि कमी दुष्परिणामांमुळे हर्बल स्रोत असलेल्या आणि खाद्य म्हणून वापरण्यात येणाऱ्या तसेच जैव सक्रिय संयुगे असलेले मशरूम व्यावसायिक स्वारस्य मिळवत आहेत
मशरूम हे खाद्यपदार्थांचा लोकप्रिय स्त्रोत आहेत आणि ईशान्य भारतात विविध प्रकारचे मशरूम्स उपलब्ध आहेत. मशरूमच्या या वाढत्या लोकप्रियतेमुळे, कोविड-19 आणि इतर विषाणूजन्य संसर्गाविरूद्धच्या गुंतागुंत कमी करण्यासाठी खाण्यायोग्य मशरूम आणि मशरूममधील नैसर्गिक संयुगे यांच्या महत्त्वाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगत अभ्यास संस्था ( आयएएसएसटी ) या स्वायत्त संस्थेतील संशोधकांनी महत्वाचे विश्लेषण केले.
आयएएसएसटीचे संचालक प्रा . आशिस के मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील आयएएसएसटी, गुवाहाटी येथील डॉ अपरूप पात्रा, डॉ एम आर खान, डॉ सागर आर बर्गे आणि परण बरुआ यांचा समावेश असलेल्या संशोधन गटाने हे विश्लेषण केले. कोविड 19 विरुद्ध लढण्याचे सध्याच्या उपचारांच्या तुलनेत सहजपणे मिळणाऱ्या मशरूम आणि त्यांच्या जैव सक्रिय रेणूंच्या विस्तृत श्रेणीतून मिळणारे नैसर्गिक संसर्गविरोधी, विषाणुरोधी, दाह प्रतिबंधक आणि अँटीथ्रोम्बोटिक गुणधर्मांच्या घटकांसंदर्भात हे विश्लेषण करण्यात आले.
विश्लेषण लेखात, शास्त्रज्ञांनी सार्स -सीओव्ही -2 संसर्ग आणि त्याच्या संसर्गाशी संबंधित पॅथोफिजियोलॉजी,म्हणजेच फुफ्फुसाचा संसर्ग, जळजळ, साइटोकिन स्टोम आणि रक्ताच्या गुठळ्या आणि हृदय तसेच रक्तवाहिन्यासंबंधी परिणाम रोखण्यासाठी शास्त्रज्ञांनी 13 वेगवेगळ्या मशरूम-मधील जैवसक्रीय संयुगांच्या भूमिका आणि यंत्रणांचे विश्लेषण केले आहे
या संशोधकांच्या अभ्यासात असे म्हटले आहे की, मशरूममध्ये जैवसक्रीय बहुशर्करा (पॉलिसेकेराइड्स) आणि रोगप्रतिकारक शक्तीवर प्रभावी इम्युनोमोड्युलेटिंग, विषाणूविरोधी , जिवाणूविरोधी , बुरशीविरोधीआणि इतर औषधी गुणधर्म असलेली संयुगे असतात.त्यात असेही म्हटले आहे की, सार्स सीओव्ही - 2 विरुद्ध आशादायक परिणामांसह मशरूम-आधारित औषधांची मानवी चाचणी केली जात आहे.
विषाणूजन्य संसर्गाविरूद्ध खाण्यायोग्य मशरूम वापरण्याचे मुख्य फायदे आहेत ते म्हणजे कोणतेही दुष्परिणाम नसलेले हे पोषक पूरक अन्न असून रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे म्हणून मशरूमचा वापर केला जाऊ शकतो.
सखोल वैद्यकीय पूर्व आणि वैद्यकीय अभ्यासाद्वारे मशरूम-आधारित जैवसक्रीय संयुगांची भूमिका अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मोठ्या संधी आहेत , असे जर्नल ऑफ फंगी मधील अभ्यासात सूचित करण्यात आले आहे. या संदर्भात संशोधक, आरोग्य व्यावसायिक आणि धोरणकर्ते यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे.
प्रकाशीत अभ्यास येथे पाहता येईल.: https://doi.org/10.3390/jof9090897
N.Meshram/S.Chavan/P.Malandkar
(Release ID: 1991573)
Visitor Counter : 129