अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘सीबीडीटी’ने प्राप्तीकर कायदा,1961 मधील कलम 194-ओ अंतर्गत मार्गदर्शक सूचना केल्या जारी

Posted On: 28 DEC 2023 9:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2023

प्रत्यक्ष कर केंद्रीय मंडळाने प्राप्तीकर कायदा,1961 (‘कायदा’) मधील कलम 194-ओ नुसार ई-वाणिज्य परिचालकाच्या डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक सुविधा अथवा मंचाच्या माध्यमातून झालेली वस्तूंची विक्री किंवा दिलेली सेवा अथवा दोन्हीतून मिळालेल्या एकूण उत्पन्नावर त्या परिचालकाने एक टक्का दराने प्राप्तीकर वजा करावा अशी तरतूद आहे.  

सीबीडीटीच्या दिनांक 28.12.2023 रोजी जारी अधिकृत परिपत्रक क्र.20/2023 नुसार कलम 194-ओ मधील गुंतागुंत सोडवण्यासाठी आणि डिजिटल वाणिज्य व्यवहारांसाठी खुले नेटवर्क (ओएनडीसी) यांसारख्या बहुविध ई-वाणिज्य परिचालक मॉडेल नेटवर्कसंदर्भात सदर कलमाच्या व्यवहार्यतेशी संबंधित विविध मुद्द्यांबाबत स्पष्टता आणण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या परिपत्रकामध्ये विविध प्रकारच्या परिस्थितीची तपशीलवार उदाहरणे देण्यात आली असून हे पत्रक विविध मुद्द्यांबाबत स्पष्टता देते. विविध विभागांकडून मिळालेल्या सूचनांनुसार, सीबीडीटी परिपत्रकात विविध मुद्द्यांवरील एफएक्यूज म्हणजे वारंवार विचारले जाणारे प्रश्न समाविष्ट करून घेण्यात आले आहेत.

सदर परिपत्रक www.incometaxindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
S.Bedekar/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 1991385) Visitor Counter : 140


Read this release in: English , Urdu , Hindi