राष्ट्रपती कार्यालय
नाताळच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा देशवासियांना संदेश
प्रविष्टि तिथि:
24 DEC 2023 7:11PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाताळच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
"नाताळच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासियांना, विशेषत: ख्रिस्ती बंधू-भगिनींना माझ्या हार्दिक शुभेच्छा", असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
"येशू ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जाणारा हा नाताळचा सण, प्रेम आणि करुणेचा संदेश देतो. हा सण आपल्याला मानवतेची निःस्वार्थ सेवा करण्यासाठीही प्रेरणा देतो. समाजात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी येशू ख्रिस्तांची शिकवण नेहमीच समर्पक राहिली आहे.
या पवित्र सणानिमित्त, प्रत्येकाने स्वतःमध्ये दया आणि करुणेची भावना जागृत करावी आणि येशू ख्रिस्तांच्या शिकवणुकीचं अनुसरण करावं", असंही राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया इथे क्लिक करा -
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1990168)
आगंतुक पटल : 109