ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

औष्णिक ऊर्जा प्रकल्पात ज्वलनासाठी इंधन म्हणून कोळशासह वापरल्या जाणाऱ्या सेंद्रीय कचऱ्याच्या थाप्यांच्या मूल्याचे नियमन करण्याचे धोरण

Posted On: 23 DEC 2023 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 23 डिसेंबर 2023


शाश्वत पुरवठा साखळीचा प्रचार आणि विकास करण्याच्या उद्देशाने आणि त्याच वेळी औष्णिक उर्जा प्रकल्पांमध्ये ज्वलनासाठी इंधन म्हणून कोळशासह सेंद्रीय कचऱ्याच्या थाप्यांची  (बायोमास पेलेट) जलद खरेदी सुनिश्चित करण्यासाठी, ऊर्जा मंत्रालयाने (MoP) 23.08.2023 आणि 08.11.2023 रोजी, नॉन-टोरिफाईड बायोमास पेलेटची म्हणजेच ओल्या सेंद्रिय कचऱ्याचे (सेंद्रीय कचऱ्याच्या थाप्यांसाठीचा कच्चा माल) प्रमाणित मूल्य (बेंचमार्क प्राईस) जारी केले आहे. केंद्रीय उर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR), उत्तर (NCR वगळून) विभाग आणि पश्चिम विभागासाठी हे मुल्य अनुक्रमे, रु. 2.32, रु. 2.27 आणि रु. 2.24 प्रति 1000 किलो कॅलरी (वस्तू सेवा कर आणि थाप्या उत्पादन केंद्रापासून ते औष्णिक ऊर्जा प्रकल्पापर्यंतचा वाहतूक खर्च वगळून) इतके निश्चित केले आहे. बाजारातील कच्च्या बायोमासच्या किमती स्थिर राहण्यावरही याचा परिणाम होईल.

शाश्वत ऊर्जा वाढ, गुंतवणुक यांना पोषक वातावरण निर्माण करण्याकरता आणि देशात अधिक संघटीत आणि तुल्यबळ नवीकरणीय उर्जा बाजारपेठ स्थापन करण्यासाठी सरकारने वेळोवेळी अनेक पावले उचलली आहेत.

केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री आर के सिंह यांनी 21 डिसेंबर 2023 रोजी, लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.
 
M.Pange/A.Save/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(Release ID: 1989915) Visitor Counter : 126


Read this release in: English , Urdu