ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधील पाण्याचा वापर कमी करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना

Posted On: 23 DEC 2023 10:16AM by PIB Mumbai

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने दिनांक 07.12.2015 च्या अधिसूचनेद्वारे, 28.06.2018 रोजी त्यात आणखी सुधारणा करून, औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसाठी  पाण्याच्या वापरासंबंधी नियम अधिसूचित केले आहेत अशी माहिती केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्र्यांनी दिली आहे. त्यानुसार 05.09.2022 रोजी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अधिसूचनेद्वारे त्याचे पालन करण्याच्या कालमर्यादेत बदल करण्यात आला आहे.

नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने पाण्याचा वापर कमी करण्यासाठी औष्णिक ऊर्जा प्रकल्पांद्वारे खालील उपाय अवलंबले जात आहेत:

i. एअर कूल्ड कंडेन्सर (एसीसी ) तंत्रज्ञानाचा अवलंब  एनटीपीसी मध्ये दोन ठिकाणी - उत्तर करणपुरा एसटीपीपी (3x660 एमडब्ल्यू ) आणि पत्रातू एसटीपीपी  (3x800 एमडब्ल्यू ) केला जात आहे. त्यापैकी, उत्तर करणपुराचे पहिले युनिट 18.01.2023 रोजी कार्यान्वित झाले आहे.

ii. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या (एसटीपी) च्या 50 किमी परिसरात असलेल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसाठी प्रक्रिया-युक्त  सांडपाण्याचा अनिवार्य वापर – केंद्र सरकारने 28.01.2016 रोजी नवीन दर धोरण अधिसूचित केले आहे, ज्यामध्ये नगरपालिका/स्थानिक स्वराज्य संस्था/तत्सम संस्थेच्या एसटीपीच्या 50 किमी परिसरातील प्रकल्पासह औष्णिक उर्जा प्रकल्पांनी, ते एसटीपीच्या जवळ असल्यामुळे या संस्थांनी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे अनिवार्य केले आहे. आजपर्यंत, देशातील 8 कोळसा, लिग्नाइट आणि वायू- आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्प त्यांच्या संयंत्रांमध्ये एसटीपी पाणी वापरत आहेत.

iii. ड्राय फ्लाय ऍश हाताळणी प्रणाली आणि हाय कॉन्सन्ट्रेशन  स्लरी डिस्पोजल सिस्टम -ऍश हाताळणीच्या या तंत्रांमुळे ऍश हाताळणी पाण्याची आवश्यकता कमी होते आणि परिणामी पाण्याचा वापर कमी होतो.

iv. जिथे ऍश पॉण्ड शोधून ते व्यवस्थेत पुन्हा वापरले जात आहे अशा ठिकाणी ऍश वॉटर  री-सर्कुलेशन प्रणाली लागू केली जाते.

v. झिरो वॉटर डिस्चार्ज प्रणाली - संयंत्रांमध्ये तयार होणारे सांडपाणी ऍश हाताळणी, कोळ डस्ट सप्रेशन  आणि बागकाम इत्यादी दुय्यम वापरासाठी वापरले जाते. उर्वरित सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया केली जाते आणि संयंत्रांमधील एकूण पाण्याचा वापर कमी करण्यासाठी त्याचा पुनर्वापर केला जातो.

केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी 21 डिसेंबर 2023 रोजी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

***

HarshalA/SushamaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1989862) Visitor Counter : 103
Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali