गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी हरियाणात कुरुक्षेत्र येथे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव-2023 च्या निमित्ताने आयोजित संत संमेलन-2023 ला केले संबोधित
एखादी व्यक्ती, देश आणि संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे उत्तर गीतेच्या शिकवणीमध्ये आहे, गीतेचा संदेश देशाच्या आणि जगाच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचला पाहिजे
श्री राम जन्मभूमीवर मंदिराची उभारणी हे देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक पुनरुद्धाराच्या प्रारंभाचे प्रतीक आहे
Posted On:
22 DEC 2023 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 22 डिसेंबर 2023
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी हरियाणात कुरुक्षेत्र आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव-2023 च्या निमित्ताने आयोजित संत संमेलन-2023 ला आज संबोधित केले. या भूमीवर पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला आणि श्री ज्ञानानंदजींसारखे अनेक महात्मे या ज्ञानाचे जगभरात पुनर्स्थापित करण्यासाठी काम करत आहेत, असे यावेळी अमित शाह यांनी सांगितले. एखादी व्यक्ती, देश आणि संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे उत्तर गीतेच्या शिकवणीमध्ये आहे, गीतेचा संदेश देशाच्या आणि जगाच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचला पाहिजे,असे ते म्हणाले.
2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाचे स्वत्व जागृत करण्याचे काम केले आहे,असे अमित शाह यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नेहमीच हे सांगितले आहे की या देशाच्या महान संस्कृतीला नेहमीच पुढे नेले पाहिजे आणि या देशाचे कायदे आणि धोरणे यामध्ये भारतीय भूमीच्या मातीचा गंध असला पाहिजे.
श्री राम जन्मभूमीवर मंदिराची उभारणी हे देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक पुनरुद्धाराच्या प्रारंभाचे प्रतीक आहे, असे त्यांनी नमूद केले. श्री राम मंदिराच्या उभारणीला मोदीजींच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली आणि 22 जानेवारीला राम लल्ला राम मंदिरात असतील, असे अमित शाह म्हणाले.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1989756)
Visitor Counter : 116