युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

तामिळनाडूमध्ये होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांसाठी लोगो आणि शुभंकराचे अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते होणार अनावरण

Posted On: 21 DEC 2023 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 डिसेंबर 2023 

 

तामिळनाडूमधल्या चेन्नई येथे  शुक्रवार 22 डिसेंबर, 2023 रोजी 'खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेसाठी' अधिकृत लोगो, जर्सी, शुभंकर, मशाल  आणि संकल्पना गीताच्या अनावरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून  युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर उपस्थित राहणार आहेत.  

6 वी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा  19 ते 31 जानेवारी 2024 दरम्यान होणार आहेत.

मागील पाच  खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा दिल्ली, पुणे, गुवाहाटी, पंचकुला आणि भोपाळ येथे झाल्या आहेत. आगामी स्पर्धा तामिळनाडूच्या चेन्नई, त्रिची, मदुराई आणि कोईम्बतूर या चार शहरांमध्ये होणार आहे.

शुक्रवारी होणाऱ्या समारंभाला तामिळनाडू राज्य सरकारचे  युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन तसेच केंद्रीय क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि राज्य सरकारमधील इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बुद्धिबळपटू ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद, टोकियो ऑलिम्पियन तलवारबाज भवानी देवी, प्रसिद्ध बॅडमिंटनपटू जोश्ना चिनप्पा आणि हॉकी आशिया चषक कांस्यपदक विजेते एस. मरीश्‍वरन यांसारखे  नामवंत क्रीडापटूही उपस्थित राहणार आहेत. 

 

* * *

S.Bedekar/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1989355) Visitor Counter : 109