नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विमानांच्या ताफ्यात 2014 मधील 400 वरून 644 पर्यंत वाढ - ज्योतिरादित्य एम. शिंदे

Posted On: 21 DEC 2023 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 डिसेंबर 2023 

 

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे  यांनी आज लोकसभेत माहिती दिली की,  आपल्या विमान ताफ्यात अतिशय वेगाने वाढ होत आहे. 2014 मध्ये केवळ  400 विमाने असलेल्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात आज जवळपास 644 विमाने आहेत.

“शेड्युल्ड व्यावसायिक विमान कंपन्यांच्या दृष्टिकोनातून जमिनीवर असलेल्या म्हणजेच काही कारणाने सध्‍या उड्डाण केले जात नसलेल्या  विमानांची संख्या अंदाजे 140 आहे. इंजिन पुरवठादार प्रॅट आणि व्हिटनी यांना  पुरवठा साखळीतील समस्यांना तोंड द्यावे लागत  आहे. आम्ही प्रॅट आणि व्हिटनी यांच्या थेट संपर्कात आहोत आणि ही परिस्थिती अस्वीकार्य असल्याचे त्यांना कळवले आहे, कारण भारतातील विमान वाहतुकीत वेगाने वाढ होत आहे" असे त्यांनी सांगितले.

आपला ताफा सतत विस्तारत असून गेल्या वर्षी  626 असलेली विमान संख्‍या   आता  644 वर पोहोचली  आहे. मार्च 2024 पर्यंत, दरमहा सुमारे 2 ते 5 विमानांचा  ताफ्यात समावेश केल्यानंतर ही संख्या 686 पर्यंत वाढेल , अशी माहिती  शिंदे  यांनी सभागृहाला दिली.

 

* * *

S.Bedekar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1989220)
Read this release in: English , Urdu , Hindi