श्रम आणि रोजगार मंत्रालय
शेतमजूर आणि ग्रामीण मजुरांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक दर निर्देशांक -नोव्हेंबर, 2023
Posted On:
21 DEC 2023 10:47AM by PIB Mumbai
शेतमजूर आणि ग्रामीण मजुरांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक दर निर्देशांकाचा आकडा, (आधारभूत वर्ष: 1986-87=100) नोव्हेंबर, 2023 मध्ये अनुक्रमे 12 आणि 11 अंकांनी वधारला आहे आणि तो अनुक्रमे 1253 आणि 1262 इतका झाला आहे. शेतमजूर आणि ग्रामीण मजूर यांच्या सामान्य निर्देशांकात अनुक्रमे 10.85 आणि 10.50 अंक इतकी वाढ होण्यामागे, प्रामुख्याने तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळी, कांदे, अख्खी हळद, लसूण, मिश्र मसाले, इ. यांच्या किमतीत झालेल्या वाढीचे मुख्य योगदान आहे.
पश्चिम बंगाल (सीपीआय-एएल आणि सीपीआय-आरएल दोन्ही निर्देशांक कमी झाले) आणि हिमाचल प्रदेश (सीपीआय-एएल निर्देशांक कमी राहिला) वगळता सर्व राज्यांमध्ये निर्देशांकात वरचा कल आहे.
शेतमजुरांच्या बाबतीत 11 राज्यात, त्यात 1 ते 10 अंकांची, 4 राज्यांमध्ये 11 ते 20 अंकांची आणि 3 राज्यांमध्ये 20 हून अधिक अंकांची वाढ झाली. निर्देशांक सारणीत 1453 अंकांसह तामिळनाडू अग्रस्थानी आहे तर हिमाचल प्रदेश 958 अंकांसह तळाशी आहे.
ग्रामीण मजुरांच्या बाबतीत 11 राज्यात, त्यात 1 ते 10 अंकांची, 5 राज्यांमध्ये 11 ते 20 अंकांची आणि 3 राज्यांमध्ये 20 हून अधिक अंकांची वाढ झाली. निर्देशांक सारणीत 1439 अंकांसह आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू अग्रस्थानी आहेत तर हिमाचल प्रदेश 1015 अंकांसह तळाशी आहे.
राज्यांमध्ये, शेतमजुरांसाठीच्या ग्राहक दर निर्देशांकात सर्वाधिक वाढ 27 अंकांसह महाराष्ट्रात झाली. ही वाढ प्रामुख्याने ज्वारी, तांदूळ, गव्हाचे पीठ, टॅपिओका, तूरडाळ, कांडी, साखर, इ. वाढीव किमतीमुळे प्रामुख्याने झाली.
ग्रामीण मजुरांसाठीच्या ग्राहक दर निर्देशांकात सर्वाधिक 24 अंकांची वाढ आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये प्रामुख्याने तांदूळ, ज्वारी, नाचणी, ताजे मासे, कांदा, तूर डाळ, भाज्या आणि फळे (विशेषतः वांगी, टोमॅटो आणि भेंडी) यांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे झाली. सीपीआय-एएल आणि सीपीआय-आरएल दोन्ही निर्देशांकात सर्वाधिक 14 अंकांची घसरण पश्चिम बंगालमध्ये, तांदूळ, आले, हिरवी मिरची, भाजीपाला आणि फळे (विशेषतः वांगी आणि भेंडी), सरपण इत्यादींच्या किमती घसरल्यामुळे झाली.
शेतमजुरांसाठीचा ग्राहक दर निर्देशांक (CPI-AL) आणि ग्रामीण मजुरांसाठीचा ग्राहक दर निर्देशांक (CPI-RL) यावर आधारित महागाईचा दर नोव्हेंबर, 2023 मध्ये अनुक्रमे 7.37% आणि 7.13% इतका राहिला. ऑक्टोबर 2023 मध्ये तो अनुक्रमे 7.08% आणि 6.92% इतका, तर मागील वर्षीच्या याच महिन्यात तो अनुक्रमे 6.87% आणि 6.99% इतका होता. त्याचप्रमाणे अन्नधान्यावर आधारित महागाईचा दर अनुक्रमे 9.38% आणि 9.14% राहिला. ऑक्टोबर 2023 मध्ये तो 8.42% आणि 8.18% आणि गेल्या वर्षीच्या याच महिन्यात तो अनुक्रमे 6.19% आणि 6.05% इतका होता.
Group
|
Agricultural Labourers
|
Rural Labourers
|
|
October, 2023
|
November, 2023
|
October, 2023
|
November, 2023
|
General Index
|
1241
|
1253
|
1251
|
1262
|
Food
|
1185
|
1201
|
1190
|
1206
|
Pan, Supari, etc.
|
2009
|
2020
|
2019
|
2030
|
Fuel & Light
|
1308
|
1307
|
1299
|
1299
|
Clothing, Bedding &Footwear
|
1266
|
1268
|
1315
|
1317
|
Miscellaneous
|
1277
|
1281
|
1282
|
1285
|
डिसेंबर 2023 साठी सीपीआय -एएल आणि आर एल 19 जानेवारी, 2024 रोजी जाहीर करण्यात येतील.
***
SonalT/SonaliK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1989055)
Visitor Counter : 150