सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आरएएमपी कार्यक्रमांतर्गत तीन उप-योजनांचा नारायण राणे यांच्या हस्ते प्रारंभ


महिलांच्या नेतृत्वाखालील एमएसएमईंसाठी झेड (ZED) योजना पूर्णपणे विनामूल्य

Posted On: 20 DEC 2023 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 डिसेंबर 2023 

 

केंद्रीय एमएसएमई मंत्री  नारायण राणे यांनी आज  आरएएमपी  कार्यक्रमाच्या अंतर्गत तीन उप-योजना सुरू केल्या. परिवर्तन योजनेसाठी एमएसएमई हरित गुंतवणूक आणि  वित्तपुरवठा (एमएसई गिफ्ट योजना), चक्रीय  अर्थव्यवस्थेत प्रोत्साहन आणि गुंतवणुकीसाठी एमएसई  योजना (एमएसई स्पाईस योजना), विलंबित पेमेंटसाठी ऑनलाइन विवाद निराकरणावर एमएसई योजना या योजना आज सुरु करण्यात आल्या.

पहिली योजना - परिवर्तन योजनेसाठी एमएसएमई हरित गुंतवणूक आणि  वित्तपुरवठा (एमएसई गिफ्ट योजना) अंतर्गत व्याज सवलत आणि कर्ज हमीच्या पाठबळासह एमएसएमईला हरित तंत्रज्ञान स्वीकारण्यास मदत करण्याचा मानस आहे.

मंत्रालय एमएसएमईंना अधिक पाठबळ देण्यासाठी विद्यमान योजनांतर्गत नवीन पुढाकार देखील घेत आहे. आयपी  कार्यक्रमाच्या व्यावसायिकीकरणासाठी (एमएसएमई  – एससीआयपी  कार्यक्रम) समर्थन एमएसएमई क्षेत्रातील नवोन्मेषकांचे  आयपीआरचे व्यावसायिकीकरण करण्यास सहाय्य करेल.

याशिवाय, मंत्रालयाची झेड (ZED ) योजना आता महिलांच्या नेतृत्वाखालील एमएसएमईसाठी पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे. सरकार प्रमाणन खर्चासाठी 100 टक्के आर्थिक सहाय्य देण्याची हमी देते. या दोन्ही उपक्रमांचा  शुभारंभही केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

राष्ट्रीय एमएसएमई परिषदेची दुसरी बैठकही  नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राणे यांनी सहभागींना संबोधित करताना, सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना एमएसएमई क्षेत्राचा प्रचार आणि विकास करण्यासाठी काम करण्यास सांगितले. जेणेकरून त्यांच्या प्रयत्नांमुळे या क्षेत्रातील उत्पन्न आणि रोजगार वाढू शकतील आणि देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल.

 

* * *

S.Bedekar/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1988912) Visitor Counter : 135


Read this release in: English , Urdu , Telugu