रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
राष्ट्रीय महामार्गांवर देशभरात 34 बोगदे प्रकल्प प्रगतिपथावर, त्यापैकी 26 बोगदे प्रकल्प हिमालयीन प्रदेशात
सुरक्षिततेचा सर्वोपरी विचार करून सर्व प्रकल्पांची रचना : नितीन गडकरी
Posted On:
20 DEC 2023 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2023
आयआरसी : एसपी :91-2019 (रस्ते बोगद्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे) नुसार जमिनीची उपलब्धता, रहदारीचे प्रमाण, बोगद्याची लांबी आणि अतिरिक्त खर्च यासारख्या विविध घटकांचा विचार करून डिझाइन करण्याच्या टप्प्यावरच वाहतूक बोगद्याला लागून स्वतंत्र सेवा बोगद्याचा विचार केला जाऊ शकतो. हा अतिरिक्त बोगदा बंद न करता देखभालीसाठी सुविधा उपलब्ध करून दिला जातो. या सेवा बोगद्याचा वापर आपत्कालीन परिस्थितीत सुटकेचा मार्ग म्हणून केला जाऊ शकतो.
धरसू-युमुनोत्री महामार्गावरील सिल्क्यरा द्वि-दिशात्मक बोगद्यात (राष्ट्रीय महामार्ग -134), दोन्ही बाजूंनी होणाऱ्या वाहनांच्या रहदारी साठी सरासरी 565 मीटर अंतराने रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या मार्गिकांच्या मध्यभागी संयुक्त भिंतीची आणि आपात्कालीन परिस्थितीत सुटका करण्याच्या उद्देशाने सरासरी 300 मी. अंतराने पादचारी क्रॉस पॅसेजसाठी तरतूद करण्यात आली आहे.
सध्या, राष्ट्रीय महामार्गांवर देशभरात 34 बोगदे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत, त्यापैकी 26 बोगदे प्रकल्प हिमालयीन प्रदेशात आहेत. सुरक्षिततेचा सर्वोपरी विचार करून सगळ्या प्रकल्पांची रचना करण्यात आली आहे. हे प्रकल्प स्थळ -विशिष्ट आवश्यकता, स्थापित कोड, अत्यावश्यक सुरक्षा उपाय समाविष्ट करून लागू केले जातात.यात आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुटका करण्यासाठी बोगदा, क्रॉस पॅसेजसह ट्विन ट्यूब, आपत्कालीन स्थितीत बाहेर पाडण्यासाठी संयुक्त भिंत, ले-बाय, स्वयंचलित अग्नी निदान आणि दाब व्यवस्था इ.चा समावेश आहे.
बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वैद्यकीय मदत देण्यात आली आणि त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले असल्याचे आढळून आले. आर्थिक सहाय्य म्हणून, प्रत्येक कामगाराला कार्यकारी एजन्सीने एक महिन्याच्या पगारी रजेव्यतिरिक्त 2.00 लाख रुपये दिले आहेत.या व्यतिरिक्त, उत्तराखंड राज्य सरकारने अडकलेल्या सर्व कामगारांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देखील केली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Bedekar/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1988743)
Visitor Counter : 94