ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिला बचत गटांसाठी ड्रोन योजना

Posted On: 19 DEC 2023 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 डिसेंबर 2023

 

केंद्र सरकारने अलीकडेच महिला बचत गटांना ड्रोन पुरविण्याच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजूरी दिली आहे. 15,000 निवडक महिला स्वयंसहायता गटांना कृषी क्षेत्राशी निगडित कार्यासाठी (खते आणि कीटकनाशक फवारणी) ड्रोन प्रदान करणे  हे  या योजनेचे उद्दिष्ट आहे.

दीनदयाल अंत्योदय योजना (DAY-NRLM) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार "अ" श्रेणी असलेले महिला बचत गट ड्रोन प्रदान करण्यासाठी निवडले जातील. मिरची, कापूस, भात, गहू इत्यादी व्यावसायिक पिके घेणार्‍या तसेच फळबागा आणि वृक्षारोपण करणाऱ्या गावांच्या समूहांमधून हे 'अ' श्रेणी महिला बचत गट निवडले जातील.

2023-24 ते 2025-2026 या तीन वर्षांच्या कालावधीत 15,000 निवडक महिला स्वयंसहायता गटांना  प्रत्येकी एक ड्रोन वितरीत करण्याचे उद्दिष्ट असलेल्या या प्रकल्पासाठी  1,261 कोटी रुपये  तरतूद  करण्यात आली आहे.

केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

N.Chitale/B.Sonatakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1988409) Visitor Counter : 180


Read this release in: English , Urdu , Hindi