अणुऊर्जा विभाग

काक्रापार अणुशक्ती प्रकल्प विभाग- 4 ने संपादन केला क्रिटीकलिटीचा पहिला महत्वाचा टप्पा, इतर आणखी प्रयोग करण्याची योजना

Posted On: 18 DEC 2023 4:45PM by PIB Mumbai

मुंबई, 18 डिसेंबर 2023

 

काक्रापार अणुशक्ती प्रकल्प (KAPP 4 – 700 MW) च्या युनिट  4 ने  17 डिसेंबर 2023 रोजी 1.17 वाजता, पहिल्यांदाच क्रिटीकलिटीचा (नियंत्रित विखंडित मालिका) महत्वाचा टप्पा पार केला आहे. अणु ऊर्जा नियामक मंडळाच्या सर्व निकषांची पूर्तता केल्यानंतर क्रिटीकलिटीचा हा टप्पा यशस्वी झाला असून या प्रकल्पातील सर्व प्रणालींच्या सुरक्षिततेचा कठोर आढावा घेतल्यानंतर मंडळाकडून ही चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली होती. KAPP-4 हा देशात स्थापन केल्या जात असलेल्या प्रत्येकी 700 मेगा वॅट  अणुऊर्जा क्षमतेच्या सोळा स्वदेशी नियंत्रित जड जल अणुभट्टी प्रकल्प मालिकेतील एक प्रकल्प आहे.

पहिल्या क्रिटीकलिटी चाचणीनंतर, अनेक प्रयोग, चाचण्या KAPP-4  मधे केल्या जाणार असून, अणुऊर्जा नियामक मंडळाच्या परवानग्या मिळाल्यानंतर, पुढच्या पावलावर ऊर्जा स्तर वाढवला जाणार आहे. टप्याटप्याने  विभागाची संपूर्ण स्थापित ऊर्जा क्षमता कार्यरत केली जाणार आहे.

KAPP 3 आणि 4 (2X700 MW) गुजरातच्या सूरत जिल्ह्यातील काक्रापार इथे विद्यमान KAPS 1&2 (2X220 MW) अणुभट्ट्यांच्या शेजारी आहेत. या स्वदेशी PHWR मध्ये अद्ययावत सुरक्षा व्यवस्था असून ते जगातील सर्वात सुरक्षित अणुभट्ट्या प्रकल्पापैकी एक आहेत. या अणुभट्ट्यांची रचना, बांधणी, कार्यान्वित आणि संचालन एनपीसीआयएल करत आहे, तर , उपकरणांचा पुरवठा आणि कराराची अंमलबजावणी भारतीय उद्योग/कंपन्यांनी केली आहे. ह्या अणुभट्ट्या  आत्मनिर्भर भारताच्या भावनेचे खरे प्रतिबिंब आहे.

या कार्यक्रमाला  एनपीसीआयएलचे मुख्य  व्यवस्थापकीय संचालक बी.सी.पाठक आपल्या चमूसह, या प्रकल्पाच्या नियंत्रण कक्षात उपस्थित होते. एनपीसीआयएल मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी व्हिडिओ लिंकद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रसारण पाहिले. कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष स्थळावरील तसेच  मुख्यालयातील अधिकाऱ्यांना संबोधित करताना, एनपीसीआयएल चे सीएमडी पाठक यांनी एनपीसीआयएल च्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, युनिट-3 च्या व्यावसायिक ऑपरेशनच्या सहा महिन्यांत KAPP-4 ची क्रिटिकलटी चा टप्पा गाठता येणे, ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी  आहे. KAPP-3 च्या सुरळीत ऑपरेशनसह, या चाचणीने अणुऊर्जेच्या डिझाइन, बांधकाम, कमिशनिंग आणि ऑपरेशन अशा सर्व पैलूंमध्ये एनपीसीआयएलचे सामर्थ्य  दाखवले. बांधणी सुरु असलेले  युनिट जलद गतीने पूर्ण करण्यासाठी सर्वांनी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

एन पी सी आय एल कडे सध्या 23 अणुभट्ट्याची जबाबदारी असून त्यांची एकूण स्थापित क्षमता 7480 मेगा वॅट इतकी आहे. आणि 7500 मेगावॅट क्षमतेचे नऊ युनिट्स (KAPP-4 सह) प्रगतीपथावर आहेत. याशिवाय, एकूण 7000 मेगावॅट क्षमतेच्या आणखी 10 अणुभट्ट्या प्रकल्पपूर्व उपक्रमात आहेत. 2031-32 पर्यंत त्या  हळूहळू पूर्ण होणे अपेक्षित आहे.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1987751) Visitor Counter : 74


Read this release in: English , Urdu , Hindi