कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोळसा मंत्रालय व्यावसायिक कोळसा खाण लिलावाची 9वी फेरी सुरू करणार


चार राज्यांमधील 26 कोळसा खाणींचा होणार लिलाव

Posted On: 18 DEC 2023 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर 2023

 

ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, कोळसा मंत्रालय 20 डिसेंबर 2023 रोजी व्यावसायिक कोळसा खाण लिलावाची 9 वी फेरी सुरु करून आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलणार आहे. कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री  प्रल्हाद जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे या कार्यक्रमाचे सन्माननीय  पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

व्यावसायिक कोळसा लिलावाची आगामी 9वी फेरी कोळसा क्षेत्रातील  खाजगी कंपन्यांचा सहभाग वाढवण्यासाठी, स्पर्धा, कार्यक्षमता, नवोन्मेष वाढवण्यासाठी तसेच शाश्वत विकासात योगदान देण्यासाठी सज्ज आहे. हा उपक्रम कॅप्टिव्ह आणि व्यावसायिक कोळसा खाणींमधून कोळसा उत्पादन आणि पुरवठ्याच्या अभूतपूर्व कामगिरीचे अनुसरण करतो.

मंत्रालयाने 2014 पासून कोळसा क्षेत्रात केलेल्या सुधारणा आणि कामगिरीचा भर देशांतर्गत कोळसा उत्पादनात वृद्धी , आयात अवलंबित्व कमी करणे आणि देशाला कोळसा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यावर आहे.  मंत्रालयाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलून कोळसा सुधारणांद्वारे देशाच्या ऊर्जा परिदृश्याला आकार देण्याप्रति आपली अतूट वचनबद्धता दर्शवली आहे. यापूर्वीच्या  यशस्वी लिलावांच्या पार्श्‍वभूमीवर व्यावसायिक कोळसा खाण लिलावाची आगामी 9 वी फेरी या क्षेत्राला पुढे नेण्याच्या मंत्रालयाच्या अतूट वचनबद्धतेचे द्योतक आहे.

आगामी फेरीत एकूण 26 कोळसा खाणींचा समावेश असेल.

खाणींची राज्यनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

State

Total Mines

Mines under

Type of Coal

Exploration Status

CM(SP) Act, 2015

MMDR Act, 1957

Coking

Non-Coking

Lignite

Fully Explored

Partially Explored

Chhattisgarh

8

2

6

0

8

0

3

5

Jharkhand

5

0

5

5

0

0

0

5

Madhya Pradesh

12

1

11

1

11

0

3

9

Telangana

1

0

1

0

1

0

1

0

Total

26

3

23

6

20

0

7

19

 

तसेच आगामी व्यावसायिक कोळसा खाण लिलावांमध्ये आर्थिक विकासाला चालना देण्याची, रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची, ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्याची आणि शाश्वत विकासात योगदान देण्याची क्षमता आहे. ऊर्जा क्षेत्रातील वाढ आणि नवोन्मेषाला अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी मंत्रालय वचनबद्ध आहे.

एमएसटीसी लिलाव प्लॅटफॉर्मवर खाणी, लिलावाच्या अटी, मुदत आणि इतर संबंधित सविस्तर  माहिती मिळू शकेल.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1987723) Visitor Counter : 99