माहिती आणि प्रसारण मंत्रालय
विकसित भारत संकल्प यात्रेला एक महिना पूर्ण : कृतीमध्ये परिवर्तनाची
Posted On:
16 DEC 2023 2:54PM by PIB Mumbai
संपूर्ण भारतामध्ये ही परिवर्तनाची चळवळ रुजत आहे. विकसित भारत संकल्प यात्रा हा आशेचा चैतन्यपूर्ण रथ, सर्व भारतीयांच्या दारात पोहोचून सक्षमीकरण आणि उज्ज्वल भविष्याचे आश्वासन घेऊन आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर रोजी झारखंडमधील खुंटी येथून हिरवा झेंडा दाखविलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये विविध कल्याणकारी योजनांबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि योजनांची 100% संतृप्तता सुनिश्चित करण्यासाठी “जन भागीदारी” च्या भावनेने त्यांना सहभागी करणे हा आहे. हा भारत सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा जनसंपर्क उपक्रम असून या द्वारे 25 जानेवारी 2024 पर्यंत देशभरातील 2.60 लाख ग्रामपंचायती आणि 4000 हून अधिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचण्याचे उद्दीष्ट आहे.
अवघ्या एका महिन्याच्या अल्पावधीत या यात्रेने देशातील 68,000 ग्रामपंचायतींमधील 2.50 कोटींहून अधिक नागरिकांशी संपर्क साधला आहे. याशिवाय, जवळपास 2 कोटी लोकांनी विकसित भारत संकल्प घेतला आहे आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या 2 कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी ‘मेरी कहानी मेरी जुबानी’ उपक्रमांतर्गत त्यांचे अनुभव सामायिक केले आहेत.
विकसित भारत संकल्प यात्रा, सरकार केवळ आश्वासने देत नाही, तर मूर्त स्वरूपात सुधारणांचा मार्ग प्रशस्त करण्याच्या मार्गावर प्रवास करत असल्याचे द्योतक आहे. प्रगतीचे चैतन्यदायी चित्र सादर करणाऱ्या काही उपलब्धी पुढीलप्रमाणे -
आजपर्यंतची आकडेवारी (16 डिसेंबर 2023, दुपारी 1:00 वाजेपर्यंत)
Gram Panchayats Covered
|
68,267
|
Urban Locations Covered
|
1,737
|
People Attended
|
2,54,81,761
|
‘Meri Kahani Meri Zubani’ Beneficiaries
|
2,05,31,050
|
People taking Viksit Bharat Sankalp
|
1,96,46,326
|
ऑन स्पॉट सेवा (16 डिसेंबर 2023, दुपारी 1:00 वाजेपर्यंत)
आरोग्य तपासणीपासून ते आयुष्मान कार्ड जारी करण्यापर्यंत, यात्रेच्या ऑन-स्पॉट सेवा आणि त्यांच्या प्रभावाची एक झलक येथे पाहायला मिळते:
People Screened in Health Camps
|
51,34,322
|
Ayushman Bharat Card Issued
|
10,18,367
|
People Screened for Sickle Cell
|
7,66,287
|
People Screened for Tuberculosis (TB)
|
35,14,793
|
MY Bharat Volunteer Registration
|
7,61,202
|
PM Ujjwala Yojana Registration
|
3,26,580
|
PM Jeevan Jyoti Bima Yojana Registration
|
3,67,850
|
PM Suraksha Bima Yojana Registration
|
6,52,985
|
People Visited PM SVANidhi Camp
|
1,95,734
|
Drone Demonstrations
|
29,372
|
Soil Health Card Demonstrations
|
35,455
|
100% संपृक्तता (16 डिसेंबर 2023, दुपारी 1:00 वाजेपर्यंत)
ग्रामपंचायतींची संख्या :
विकसित भारत संकल्प यात्रा प्रगतीच्या मार्गावर अनेक महत्वपूर्ण टप्पे गाठत आहे, 100% आयुष्मान कवच, हर घर जल जोडणी, डिजिटलाइज्ड भूमी अभिलेख आणि हगणदारी मुक्त (ODF) प्लस दर्जासह प्रगती साधलेल्या ग्रामपंचायतीचे तपशील येथे आहेत:
Ayushman Card Saturation
|
33,713
|
Har Ghar Jal – Jal Jeevan Mission
|
24,925
|
100% Digitization of Land Records
|
39,504
|
ODF Plus Model
|
11,565
|
विकसित भारत संकल्प यात्रेचे यश तिच्या आकडेवारी आणि संख्याशास्त्राच्या पलीकडे आहे; ही यात्रा अगणित जीवनात परिवर्तन घडवणारे संकलन आहे.
https://viksitbharatsankalp.gov.in/. या संकेतस्थळावर तुम्ही आशा आणि प्रगतीच्या अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकू शकता.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1987161)
Visitor Counter : 143