अर्थ मंत्रालय
सार्वभौम सुवर्ण रोखे 2023-24 योजनेअंतर्गत (मालिका 3) नोंदणी, डिसेंबर 18 ते 22, 2023 दरम्यान होणार खुली
Posted On:
15 DEC 2023 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2023
भारत सरकारची दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजीच्या अधिसूचना क्रमांक .4(6)-B(W&M)/2023, सार्वभौम सुवर्ण रोखे 2023 -24 (मालिका 3) ची नोंदणी, 18 ते 22 डिसेंबर 2023 रोजी, खुली होणार असून, त्याच्या निपटाऱ्याची तारीख 28 डिसेंबर 2023 ही असेल.
रोखे जारी करण्याच्या वेळी, नोंदणीच्या काळात, त्यांची किंमत 6,199 रुपये प्रती ग्राम इतकी असेल. रिजर्व बँकेने, त्यांच्या 15 डिसेंबर 2023 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकात, ही किंमत नमूद केली आहे.
केंद्र सरकारने रिजर्व बँकेशी सल्लामसलत करून, ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीने पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना जारी किंमतीतून प्रति ग्रॅम 50 रुपयांची (केवळ पन्नास रुपये) सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी सोन्याच्या रोख्यांची निर्गम किंमत प्रति ग्रॅम 6,149 रुपये (फक्त सहा हजार एकशे चाळीस-नऊ रुपये) असेल.
* * *
S.Kane/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1986997)
Visitor Counter : 255