रेल्वे मंत्रालय
गेल्या पाच वर्षांत, राष्ट्रीय रेल सुरक्षा कोषावर 1,05,378 कोटी रुपये खर्च
कालबाह्य झालेल्या रेल्वे मालमत्ता काढून कालावधी सह-अटीच्या आधारावर नवीन तंत्रज्ञानाने बदलण्यात आल्या
प्रविष्टि तिथि:
15 DEC 2023 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2023
रेल्वेची मालमत्ता उदा. रेल्वे मार्गिका, पूल, इंजिन, डबे आणि सिग्नलिंग उपकरणे बदलणे ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, जी उपकरणांचे सामान्य सरासरी आयुष्य तरतुदींच्या अंतर्गत वय-सह-अटीनुसार केली जाते. सेवेसाठी त्यांची तंदुरुस्ती सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे मालमत्तेची नियमित तपासणी केली जाते.कालबाह्य झालेल्या रेल्वे मालमत्ता काढून टाकल्या जातात नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे बदललया जातात.
गेल्या 5 वर्षांतील मालमत्तेची बदली/सुधारणा यावरील प्रत्यक्ष खर्च खाली दिलेला आहे:
|
(₹ in Crore)
|
|
Year
|
Amount
|
|
2018-19
|
20407
|
|
2019-20
|
18557
|
|
2020-21
|
28529
|
|
2021-22
|
28517
|
|
2022-23
|
26855
|
|
Total
|
122865
|
एकूण खर्च1,22,865 कोटी रुपये असून एकूण अर्थसंकल्पीय सहाय्यातून आणि रेल्वे मंत्रालयावरील अंतर्गत निर्मिती आणि अतिरिक्त अर्थसंकल्पीय संसाधनांमधून ₹78,501 कोटी शिल्लक आहे. खर्चाचा अंदाज 2023-24 साठी खर्च 29,325 कोटी रुपये आहे.
अर्थसंकल्पीय अंदाज 2023-24 मध्ये पीएच -31 रेल्वे मार्गिका नूतनीकरणासाठी 17,297 कोटी रुपये आणि पीएच-21 रोलिंग स्टॉक साठी 2000 कोटी रुपये खर्च आहे.
(₹ In Crore)
|
Year
|
Track Renewals
|
Rolling Stock Programme
|
|
2018-19
|
9690
|
1815
|
|
2019-20
|
9391
|
1178
|
|
2020-21
|
13523
|
3466
|
|
2021-22
|
16558
|
2870
|
|
2022-23
|
16325
|
2034
|
राष्ट्रीय रेल संरक्षण कोष 2017-18 मध्ये पाच वर्षांच्या कालावधीसाठी 1 लाख कोटींच्या निधीसह महत्वाच्या सुरक्षा मालमत्तेचे नूतनीकरण/ बदली/ अपग्रेडेशनसाठी सुरू करण्यात आला आहे. निधीचे चलन 2022-23 पासून आणखी पाच वर्षांच्या कालावधीसाठी ₹45000 कोटींच्या सकल अर्थसंकल्पीय पाठबळासह (जीबीएस) वाढवण्यात आले आहे.
गेल्या पाच वर्षांत म्हणजे 2018-19 ते 2022-23 पर्यंत, आरआरएसके कामांवर 1,05,378 कोटी रुपये खर्च झाला आहे. यामध्ये जीबीएसकडून 65,000 कोटी रुपये आणि रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत आणि अतिरिक्त अर्थसंकल्पीय संसाधनांमधून 40,378 कोटी रुपये शिल्लक आहेत.
रेल्वे, दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Kane/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1986808)
आगंतुक पटल : 68