संरक्षण मंत्रालय
युद्धसामग्री निर्मितीमध्ये आत्मनिर्भरता: भारतीय लष्करासाठी इलेक्ट्रॉनिक फ्यूजच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत 5,336.25 कोटी रूपयांचा 10 वर्षासाठी करार
Posted On:
15 DEC 2023 12:42PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्रालयाने 15 डिसेंबर 2023 रोजी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), पुणे सोबत 10 वर्षांच्या कालावधीसाठी, एकूण 5,336.25 कोटी रुपये खर्चाच्या इलेक्ट्रॉनिक फ्यूजच्या खरेदीसाठी ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली. ‘आत्मनिर्भर भारत’ दृष्टीकोनाचा एक भाग म्हणून,हा करार ‘भारतीय उद्योगांद्वारे भारतीय लष्करासाठी युद्धसामग्री निर्मिती’ अंतर्गत युद्धसामग्री खरेदीसाठी करण्यात आला असून हा सरकारी उपक्रम 10 वर्षांच्या दीर्घकालीन गरजांच्या पूर्ततेसाठी आहे. आयात कमी करण्यासाठी युद्धसामग्रीची साठवणूक करणे , युद्धसामग्रीच्या उत्पादनात स्वयंपूर्णता प्राप्त करणे, महत्वाचे तंत्रज्ञान मिळवणे आणि पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे प्रभावित होणारा युद्धसामग्रीचा साठा
सुरक्षित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
इलेक्ट्रॉनिक फ्यूज हे मध्यम ते अवजड क्षमतेच्या तोफखान्यांचे अविभाज्य घटक आहेत जे लष्करी मोहिमांसाठी शाश्वत तोफखाना सापेक्ष क्षमता प्रदान करतात.उत्तर सीमेवरील अती उंचीच्या प्रदेशांसह विविध प्रकारच्या भूप्रदेशात शस्त्रसाठा असलेल्या तोफखान्यांमध्ये वापरण्यासाठी फ्यूज खरेदी केले जातील.
इलेक्ट्रॉनिक फ्यूजचे उत्पादन भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या पुणे आणि आगामी नागपूर प्रकल्पामधे केले जाईल.हा प्रकल्प दीड लाख मनुष्य दिवसांसाठी रोजगार निर्माण करेल आणि दारूगोळा उत्पादन आणि देशातील दारूगोळा उत्पादन व्यवस्था व्यापक करण्यासाठी एमएसएमईसह भारतीय उद्योगांच्या सक्रिय सहभागास प्रोत्साहन देईल.
***
NM/SonalC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1986622)
Visitor Counter : 108