युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
हरयाणाच्या मनीष नरवालची उल्लेखनीय कामगिरी सुरूच, नेमबाजीत पटकावले दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक
Posted On:
14 DEC 2023 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2023
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये आज तामिळनाडूच्या कस्तुरी राजमणी हिने महिलांच्या पॉवरलिफ्टिंगमध्ये 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
तर हरयाणाचा नेमबाज मनीष नरवाल याने खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धां 2023 मध्ये डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेजवर नेमबाजी स्पर्धांच्या दुसऱ्या दिवशी पदकांची लयलूट सुरूच ठेवली. त्याने पुरुषांच्या 10 मीटर एयर पिस्टल एसएच1 प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. मनीषला त्याच्या बालपणापासूनच उजव्या हाताचा वापर करण्यात समस्या आहे. त्याने सुवर्णपदक विजेती कामगिरी करताना 239.7 गुणांचा आधीचा विक्रम मागे टाकला. हा विक्रम त्याने लीमा 2023 विश्व नेमबाजी पॅरा स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये केला होता.
निकालाची ठळक वैशिष्ट्ये :
टेबल टेनिस पहिला दिवस (14 डिसेंबर 2023)
पुरुषांच्या क्लास 8 श्रेणीत मध्य प्रदेशच्या गजानन परमारचा कर्नाटकच्या शशीधर कुलकर्णीवर 3-2 असा विजय
उत्तर प्रदेशच्या अमरेश कुमार सिंगचा उत्तर प्रदेशच्या राजूवर 3-0 असा विजय
उत्तर प्रदेशच्या तुषार नागरचा उत्तर प्रदेशच्या कुणाल अरोरावर 3-0 असा विजय
कर्नाटकच्या अजय जीव्हीचा महाराष्ट्राच्या स्वप्नील शेळकेवर 3-0 असा विजय
पुरुषांच्या क्लास 9 श्रेणीत पश्चिम बंगालच्या प्रितम साहाचा महाराष्ट्राच्या दत्तप्रसाद चौगुलेवर 3-0 असा विजय
गोव्याच्या चेतन साळगावकरचा उत्तर प्रदेशच्या ब्रिजेंद्र सिंह वर 3-0 असा विजय
तामिळनाडूच्या नीतीश वाय चा उत्तर प्रदेशच्या रणजितसिंह गुज्जर वर 3-0 असा विजय
हरयाणाच्या रवींदर यादवचा कर्नाटकच्या रामकृष्णैय्या श्रीनिवासवर 3-1 असा विजय
नेमबाजी दुसरा दिवस निकाल(14 डिसेंबर 2023)
10 मीटर एयर रायफल मिश्र प्रोन एसएच11 मिश्र स्पर्धा
दीपक सैनी (हरयाणा) - 250.22)
विजय कुमार (हरयाणा- 249.33)
मोना अग्रवाल(राजस्थान)- 228.8)
पुरुषांची 10 मीटर एयर पिस्टल एसएच1 स्पर्धा
मनीष नरवाल (हरयाणा) 240-22
रुद्रांश खंडेलवाल (राजस्थान) 236.83
वैभवराजे बापू रणदिवे (महाराष्ट्र) 211.6
10 मीटर एयर रायफल प्रोन मिश्र एसएच 2
रामपाल (हरयाणा)- 625.6
विजय सिंह कुंतल ( राजस्थान)- 625.5
सत्य जनार्दन श्रीधर रायला ( तेलंगणा)- 621.4
* * *
S.Kakade/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1986477)
Visitor Counter : 134