रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
सरकारच्या तांत्रिक समित्या, वाहनांसाठी मूव्हिंग ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम्स (MOIS) ची मानके तयार करणार
एमओआयएस ही चालकांना मदत करणारी प्रगत चालक सहाय्य प्रणाली
Posted On:
14 DEC 2023 4:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2023
चोख रस्ता सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना वाढीव शिक्षेसाठी मोटार वाहन कायदा, 1988 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आली आहे. वाहतूक कायद्यांची अंमलबजावणी संबंधित राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या अखत्यारीत येते.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने एक कॉम्प्युटर एडेड डिस्पॅच सिस्टीम विकसित केली आहे जी 1033 कॉल सेंटर ऑपरेटरना जवळ उपलब्ध रस्त्यावरचे पथक (ॲम्ब्युलन्स/ क्रेन/ गस्त पथक) शोधण्यासाठी मदत करते. याशिवाय प्राधिकरणाने डिस्पॅच संबंधित माहिती महामार्गावरील पथकाकडे रिले करण्यासाठी NHAI ERS मोबाइल ऍप्लिकेशन विकसित देखील केले आहे. आपत्कालीन कॉलला जलद प्रतिसाद देण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
सरकारच्या विविध तांत्रिक समित्यांनी एम 2, एम 3 , एन 2, एन 3 अशा वाहनांसाठी मूव्हिंग ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम्स (MOIS) ची मानके तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
एमओआयएस ही एक प्रगत चालक सहाय्यक प्रणाली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1986281)
Visitor Counter : 81