कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली पोर्टलच्या क्षमतावृद्धीसाठी सरकार अद्ययावत एआय - सक्षम तंत्रज्ञान वापरत आहे - डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
13 DEC 2023 4:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 डिसेंबर 2023
केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (सीपीजीआरएएमएस) पोर्टलच्या क्षमतावृद्धीसाठी सरकार अद्ययावत एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता)-सक्षम तंत्रज्ञान वापरत असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.
तक्रारींच्या मूळ कारणांचे विश्लेषण आणि प्रणालीगत सुधारणा आणण्यासाठी डेटा स्ट्रॅटेजी युनिट देखील स्थापन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
या सुधारणांमुळे प्रकरणे प्रलंबित राहण्यात घट झाली आहे आणि सार्वजनिक तक्रारींचा निपटारा करण्याच्या सरासरी वेळेत सुधारणा झाली आहे, असे डॉ. सिंह यांनी सांगितले. मंत्रालये/विभागांनी गेल्या 16 महिन्यांत सतत 1 लाखाहून अधिक प्रकरणे/प्रतिमहिना निकाली काढली आहेत. केंद्रीय मंत्रालये/विभागांमध्ये सार्वजनिक तक्रारींची प्रलंबित संख्या 0.63 लाख प्रकरणांच्या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वच्छता संस्थात्मक करणे आणि सरकारी कार्यालयांमधील प्रलंबिततेचे प्रमाण करणे यावर 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत सार्वजनिक तक्रारींचे निवारण हा एक महत्त्वाचा घटक होता. विशेष मोहीम 2023 च्या कालावधीत सुमारे 5,21,958 (99.4%) सार्वजनिक तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
सीपीजीआरएएमएस पोर्टलला वर्ष 2023 मध्ये (30 नोव्हेंबर 2023 पर्यंत)19.45 लाख नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आणि अनुशेष तक्रारींसह सुमारे 19.60 लाख तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.
केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (सीपीजीआरएएमएस) हे एक वेब-आधारित पोर्टल आहे. केंद्र सरकारच्या किंवा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मंत्रालये/विभागाशी संबंधित आपल्या तक्रारी नागरिक या पोर्टलवर दाखल करू शकतात.
* * *
N.Chitale/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1985843)
Visitor Counter : 166