जलशक्ती मंत्रालय

राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाद्वारे दुबई येथे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत जागतिक नदीकाठच्या शहरांच्या आघाडीचे उद्‌घाटन


जीआरसीएचा शुभारंभ हा हवामान बदलाविरुद्धच्या जागतिक प्रयत्नांमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल: केंद्रीय जलशक्ती मंत्री

Posted On: 12 DEC 2023 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2023
 


केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाच्या (एनएमसीजी) च्या नेतृत्वाखाली ग्लोबल रिव्हर सिटीज अलायन्स (जीआरसीए) अर्थात जागतिक नदीकाठच्या शहरांच्या आघाडीचे, उद्‌घाटन संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई येथे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेच्या कॉप 28 मध्ये करण्यात आले. या आघाडीमध्‍ये  भारत, इजिप्त, नेदरलँड्स, डेन्मार्क, घाना, ऑस्ट्रेलिया, भूतान, कंबोडिया, जपान या देशांचा तसेच नेदरलँड्सचे हेग (डेन हाग) ऑस्ट्रेलियाचे अॅडलेड आणि हंगेरीचे स्झोलनोक या नदीकाठच्या  शहरांचा समावेश होता; त्याचबरोबर  जागतिक बँक, आशियाई विकास बँक (एडीबी), आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (एआयआयबी) या आंतरराष्ट्रीय निधी संस्था आणि केपीएमजी सारखी माहिती व्यवस्थापन संस्था यांचा समावेश होता. या संस्था आता राष्ट्रीय शहर व्यवहार संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स) आणि एनएमसीजी यांच्या संयुक्त विद्यमाने 2021 मध्ये स्थापन केलेल्या विद्यमान रिव्हर सिटीज अलायन्स (आरसीए) ची व्याप्ती वाढवण्यासाठी भागीदारी करत आहेत.

जीआरसीए ही 11 देशांमधील 275 हून अधिक जागतिक नदी-शहर, आंतरराष्ट्रीय निधी संस्था आणि माहिती व्यवस्थापन भागीदार समाविष्ट करणारी एक अनोखी आघाडी आहे आणि जगातील अशा प्रकारची ही पहिलीच आघाडी आहे. जीआरसीए चे उदघाटन, हे नदी संवर्धन आणि शाश्वत जल व्यवस्थापनाच्या दिशेने जागतिक प्रयत्नांमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यानंतर, भागीदार देश प्रभावी अंमलबजावणीसाठी जीआरसीए च्या स्थापत्याला आकार देत कॉप नंतरच्या उपक्रमांमध्ये समन्वय साधण्यास तयार आहेत.

जीआरसीए उद्‌घाटनपर सोहोळ्याला आभासी माध्‍यमातून  संबोधित करताना, केंद्रीय जलशक्ती मंत्री, गजेंद्र सिंह शेखावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनावर प्रकाश टाकला आणि नदी शहरांच्या शाश्वत विकासासाठी 2021 मध्ये सुरू करण्यात आलेल्या नदी शहर आघाडी (आरसीए) च्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी नमामी गंगे आणि मिसिसिपी नदी शहर आणि शहरी उपक्रम (इमारसीटीआय) यांच्यातील सहकार्याबद्दल सहकार्य सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमात जागतिक बँक, आशियाई विकास बँक आणि आशियाई पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक बँक यांसारख्या बहुउद्देशीय संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि पूर्ण पाठिंबा दिला. शाश्वत उपक्रम, ज्ञानाची देवाणघेवाण आणि लवचिक जागतिक जल भविष्यासाठी सहयोगी प्रयत्नांना चालना देणे हे त्यांच्या सामूहिक वचनबद्धतेचे उद्दिष्ट आहे.


S.Bedekar/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1985612) Visitor Counter : 96


Read this release in: English , Urdu , Hindi