सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
वृद्धाश्रमाविषयी लोकसभेत माहिती सादर
Posted On:
12 DEC 2023 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2023
सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रम (IPSrC) राबवत आहे, जो अटल वयो अभ्युदय योजनेचा (AVYAY) एक घटक आहे. या योजने अंतर्गत गैर-सरकारी किंवा स्वयंसेवी संस्थांना गरीब ज्येष्ठ नागरिकांना निवारा, पोषण, औषधोपचार आणि मनोरंजन यासारख्या सुविधा मोफत पुरवणारी ज्येष्ठ नागरिक गृहे (वृद्धाश्रम), कंटिन्युअस केअर होम्स इ. चालविण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी अनुदान दिले जाते. देशभरात IPSrC अंतर्गत सहाय्यित सध्याच्या 603 ज्येष्ठ नागरिक गृहांपैकी (वृद्धाश्रम) महाराष्ट्रात 49 तर गोव्यात 2 वृद्धाश्रम चालवले जात आहेत. या संदर्भात आज लोकसभेमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाच्या राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांनी माहिती दिली.
IPSrC अंतर्गत अशासकीय किंवा स्वयंसेवी संस्थांना गेल्या तीन वर्षात जारी करण्यात आलेल्या अनुदानाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-
वर्ष
|
2020-21
|
2021-22
|
2022-23
|
अनुदान
(लाख रुपये)
|
12258.27
|
9319.90
|
7231.38
|
S.Bedekar/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1985529)