गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज बिहारमधील पाटणा शहरात पूर्व विभागीय परिषदेची 26 वी बैठक संपन्न

Posted On: 10 DEC 2023 8:02PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज बिहारमधील पाटणा शहरात पूर्व विभागीय परिषदेची 26 वी बैठक संपन्न झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच ओदिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमधील वरिष्ठ मंत्री या बैठकीला उपस्थित होते. आंतरराज्य परिषद सचिवालयाचे सचिव, सदस्य राज्यांचे मुख्य सचिव, राज्य सरकार आणि केंद्रीय मंत्रालये आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001KFBU.jpg

पूर्वेकडील प्रदेश देशाची सांस्कृतिक राजधानी असण्यासोबतच प्राचीन काळापासून अनेक मोठ्या शैक्षणिक संस्थांचे केंद्र आहे, असे आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. पूर्वेकडील भागात शिक्षण क्षेत्रात अनेक प्रयोग झाले असून स्पर्धा परीक्षांमध्येही पूर्वेकडील मुले सर्वाधिक यशस्वी होतात, असेही ते म्हणाले. पूर्वेकडील प्रदेशाने संपूर्ण देशाच्या औद्योगिक विकासाचा पाया घातला असून या भागातील अनेक देशभक्तांनी देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरच्या पुनर्विकासात मोलाचे योगदान दिले आहे, असेही गृहमंत्री म्हणाले. हा प्रदेश खनिज संसाधने आणि पाण्याने समृद्ध आहे आणि बिहार, ओरिसा, झारखंड तसेच पश्चिम बंगाल सारखी पूर्वेकडील राज्ये संपूर्ण देशाची खनिजांची गरज पूर्ण करतात, असेही त्यांनी सांगितले.

सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीला संबोधित करताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, विभागीय परिषदेच्या बैठकीत 1157 प्रश्न सोडवण्यात आले आहेत.  विभागीय परिषदेच्या बैठकीत राजकीय विषयांवर मतभेद टाळून उदारमताने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा, असे ते म्हणाले.  अमित शाह म्हणाले की, विभागीय परिषदेच्या बैठकीच्या उद्दिष्टांमध्ये राष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांचाही समावेश करण्यात आला आहे.  यामध्ये 'पोषण अभियान' द्वारे मुलांमधील कुपोषण दूर करणे, शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे, जलद तपासासाठी जलदगती विशेष न्यायालये (एफटीएससी) कार्यान्वित करणे आणि महिला आणि बालिकांवरील बलात्कार प्रकरणांची जलद सुनावणी करणे यांचा समावेश आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002KJOW.jpg

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, विभागीय परिषदेच्या बैठकांची भूमिका जरी सल्लागाराची असली, तरी केंद्रीय गृहमंत्री म्हणून माझ्या साडेचार वर्षांच्या अनुभवाच्या आधारे मी असे म्हणू शकतो की, परिषदेच्या बैठकांना आणि त्यांच्या स्थायी समितीला महत्त्व देऊन आम्ही अनेक प्रश्न सोडवले आहेत.

***

S.Kane/S.Mukhedkar/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1984820) Visitor Counter : 71


Read this release in: English , Urdu , Odia , Telugu