इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृत्रिम बुद्धिमत्तेसह उन्नती आणि विकासासाठी युवा (YUVAi) हे जीपीएआय शिखर परिषद 2023 चे खास वैशिष्ट्य

Posted On: 10 DEC 2023 6:46PM by PIB Mumbai

 

कृत्रिम बुद्धिमत्तेसह उन्नती आणि विकासासाठी युवा (YUVAi)’ हा राष्ट्रीय ई-प्रशासन विभाग , इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय , भारत सरकार आणि इंटेल इंडिया यांचा एक सहयोगी उपक्रम, आगामी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात जागतिक भागिदारी (GPAI) शिखर परिषद 2023 चे खास वैशिष्ट्य म्हणून सादर करण्यात येणार आहे. तरुणांना अत्यावश्यक कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्यांसह सुसज्ज करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या उपक्रमाने भविष्यासाठी सक्षम कर्मचारी तयार करण्याच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि वचनबद्धतेमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

YUVAi चा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी समज वाढवणे, देशभरातील इयत्ता 8 ते 12 पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कौशल्यांसह सक्षम करणे आणि त्यांना मानव-केंद्रित डिझाइनर तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे वापरकर्ते बनण्यासाठी सक्षम करणे हा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात जागतिक भागिदारी (GPAI) शिखर परिषद 2023 कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील नेते, धोरणकर्ते आणि तज्ञांना एकत्र आणणारे जागतिक व्यासपीठ असून दिल्ली येथे 12-14 डिसेंबर 2023 दरम्यान ही शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात जागतिक भागिदारी (GPAI) शिखर परिषदेत YUVAi चे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सामाजिक प्रभाव प्रकल्प स्पर्धेचे सर्वोत्तम 10 अंतिम स्पर्धक सहभागी होतील आणि आपल्या प्रकल्प प्रदर्शित करतील.

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात जागतिक भागिदारी (GPAI) शिखर परिषदेत YUVAi चे मुख्य उद्दिष्ट धोरणकर्ते, शिक्षक आणि उद्योगातील नेत्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ एक साधन नसून सकारात्मक बदलासाठी एक शक्ती ठरेल असे भविष्य निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे याकरिता प्रेरित करणे हे आहे.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1984806) Visitor Counter : 139