उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मानवाधिकाराच्या बाबतीत  भारत जगासाठी आदर्श आहे  -उपराष्ट्रपती जगदीप धनखड

Posted On: 10 DEC 2023 1:37PM by PIB Mumbai

 

जगातील  लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये मानवाधिकाराना चालना देण्यात होत असलेले सकारात्मक बदल  उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अधोरेखित केले. मानव अधिकारांच्या  बाबतीत भारताने जगासमोर 'आदर्श ' म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे,असेही ते यावेळी म्हणाले. मानव अधिकारांच्या बाबतीत जगातील कोणताही भाग इतका समृद्ध नाही, जितका आपला देश मानवाधिकारांनी समृद्ध झालेला आहे”, असेही त्यांनी नमूद केले.

आज भारत मंडपम येथे मानवाधिकार दिनाच्या समारंभात बीजभाषण करताना उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले की, “प्रामुख्याने मानवी हक्क आणि मूल्यांना एवढे महत्व प्राप्त झाल्यामुळेच आपला अमृत-काळ हा आपल्यासाठी गौरव-काळ बनला आहे.त्यांनी पुढे नमूद केले की "आपली सांस्कृतिक मूल्ये आणि संवैधानिक वचनबद्धता आपल्याला मानवी हक्कांचा आदर, संरक्षण आणि संवर्धन करण्याप्रति आपली कटीबद्धता प्रतिबिंबित करते, जी आपल्या डीएनएमध्येच आहे". "मानवी हक्कांना प्रोत्साहन , संवर्धन आणि समृद्ध करण्यात भारत जगासमोर एक आदर्श उदाहरण आहे." असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

राजकारणात अलीकडच्या काळात मोफत भेटवस्तू देण्याची प्रवृत्ती वाढत आहे याविषयी बोलताना, उपराष्ट्रपतींनी सावध केले की यामुळे खर्चाच्या प्राधान्याचा विपर्यास होईल आणि आर्थिक स्थिरतेच्या मूलभूत संरचनेलाच बाधा पोहोचेल,"वित्तीय अनुदानांच्या माध्यमातून केवळ समूहाचे सक्षमीकरण होते आणि त्यामुळे केवळ अवलंबित्व वाढते" म्हणून मानवी मन आणि मानवी संसाधनांचे सक्षमीकरण, होणे गरजेचे आहे  असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

विशेषत: दुर्लक्षित घटकांच्या मानवी हक्कांच्या संवर्धनासाठी पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाचा 'गेम-चेंजर' म्हणून उल्लेख करून, उपराष्ट्रपतींनी नमूद केले की, सेवा वितरणात तंत्रज्ञानाच्या वापराने देखील ही प्रगती आणखी मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

आपल्या भाषणात, उपराष्ट्रपती यांनी सावध करत सांगितले  की "मानवी हक्कांना सर्वात मोठा धोका भ्रष्टाचारातून उद्भवतो", "भ्रष्टाचार आणि मानवी हक्क एकत्र राहू शकत नाहीत" हे अधोरेखित करून, उपराष्ट्रपती धनखड यांनी "भारतातील भ्रष्टाचाराचा हा दीर्घकाळापासूनचा शाप आता संपुष्टात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमादरम्यान, उपराष्ट्रपतींनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या  मानव अधिकार नई दिशाएं या वार्षिक हिंदी जर्नलचे तसेच एनएचआरसी वार्षिक इंग्रजी जर्नल आणि फॉरेन्सिक सायन्स अँड ह्युमन राइट्स या आयोगाच्या पुस्तकांचे प्रकाशनही केले.

***

S.Kane/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1984709) Visitor Counter : 138