संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदल अकादमी येथे आयोजित ॲडमिरल चषक स्पर्धा 2023 मधे इटली अजिंक्य
Posted On:
09 DEC 2023 2:28PM by PIB Mumbai
बाराव्या ॲडमिरल चषक सेलिंग रेगाटा स्पर्धेची सांगता आठ डिसेंबर 2023 ला एझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीच्या एट्टीकुलम किनाऱ्यावर एका दिमाखदार सोहळ्याने झाली.
मिडशिपमन एव्हलॉन अँटोनियो आणि मिडशिपमन क्रिएटी कार्लो लिओनार्डो यांच्या नेतृत्वाखालील इटालियन संघाने अॅडमिरल चषक 2023 जिंकला. भारतीय संघ या स्पर्धेचा उपविजेता ठरला. मिडशिपमन पीपीके रेड्डी आणि कॅडेट जीवाय रेड्डी यांनी प्रतिनिधित्व केलेल्या टीम इंडियानेही चमकदार कामगिरी केली.
ब्रिटीश संघाचे नेतृत्व ब्रिटीश नौदल अधिकारी कॅडेट लुसी बेल आणि मिडशिपमन आरोन मिडलटन यांनी केले तर जर्मन संघाचे नेतृत्व कॅडेट बेकमन कार्ल आणि कॅडेट हेन्झ अँटोन यांनी केले. या दोन्ही संघांनी संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले. पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत रशियाचा सीमन गोर्कुनोव्ह पेटर याने पहिला क्रमांक पटकावला, त्यानंतर इटलीचा मिडशिपमन एव्हलॉन अँटोनियो दुसऱ्या आणि भारताचा मिडशिपमन पीपीके रेड्डी तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
महिलांच्या वैयक्तिक स्पर्धेत ब्रिटनची ऑफिसर कॅडेट लुसी बेल प्रथम, इंडोनेशियाची कॅडेट सांगला एल्मा साल्सडिला द्वितीय आणि भारताची कॅडेट जान्हवी सिंग तृतीय क्रमांकावर होती.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय नौदल अकादमी कमांडंट वाइस ॲडमिरल पुनीत बहल यांनी या सांगता समारंभात विजेत्यांना ॲडमिरल चषक आणि उपविजेत्यांना उपविजेता चषक आणि व्यक्तिगत पुरस्कार प्रदान केले.
अॅडमिरल कप अंतर्गत 05 ते 08 डिसेंबर 2023 या कालावधीत स्पर्धेसाठी नियोजित दिवसांमध्ये लेझर रेडियल बोटींमध्ये स्पर्धात्मक नौकानयन शर्यत होती. 08 महिला सहभागींसह 43 स्पर्धकांनी लेझर रेडियलमध्ये आव्हान देणारा वारा आणि हवामानात आपले नौकानयन कौशल्य दाखवले आणि नौकानयनाच्या शेवटच्या चार दिवसात प्रत्येक अडथळ्यातून आपापल्या बोटी चालवल्या.
2010 मध्ये सुरुवात झाल्यापासून ह्या स्पर्धा खूप लोकप्रिय झाल्या आहे. ॲडमिरल कप सेलिंग रेगाटा 2023 च्या या आवृत्तीत 20 देश आणि भारतीय नौदल अकादमी, एझिमाला आणि खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी’च्या भारतीय संघांचा सहभाग होता.
***
M.Pange/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1984573)
Visitor Counter : 81