कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (डीएआरपीजी) दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी, वर्ष 2024 साठीच्याई-गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कारांसाठी, विविध योजना आणि वेब पोर्टलची केली सुरुवात


वर्ष 2024 साठीच्या, ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कारांसाठी, नामांकने www.nceg.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी आणि दाखल करता येतील

Posted On: 09 DEC 2023 12:00PM by PIB Mumbai

 

ई-गव्हर्नन्स (NAeG) 2024 साठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी वेब-पोर्टल (http://www.nceg.gov.in ) दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आले आहे.

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (DARPG) हा औपचारिक शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला होता.

केंद्रीय मंत्रालये / विभाग तसेच प्रधान सचिव (एआर) आणि (आयटी) आणि भारतातील सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचे डीसी/डीएम तसेच ई-गव्हर्नन्स क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वर्ष 2023 मधील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

ई-गव्हर्नन्स 2024 साठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी 8 डिसेंबर 2023 रोजी वेब पोर्टलची सुरुवात केली गेली. या संदर्भात 2 डिसेंबर 2023 रोजी वर्तमानपत्रांमधून जाहिरात करण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख 29 डिसेंबर 2023 आहे. या पुरस्कारांसाठी आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी आणि वर्ष 2024 च्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कारांसाठी आपले अर्ज सादर करण्यासाठी www.nceg.gov.in  हे पोर्टल, देखील 8 डिसेंबर 2023 ते 29 डिसेंबर 2023 पर्यंत कार्यरत राहील.

ई-गव्हर्नन्स योजनांसाठी राष्ट्रीय पुरस्कार ही योजना देशातील सर्वात स्पर्धात्मक आणि प्रतिष्ठित डिजिटल गव्हर्नन्स पुरस्कार योजनांमध्ये प्रतिष्ठेची मांडली जाते. ई-गव्हर्नन्स उपक्रमांच्या अंमलबजावणीतील उत्कृष्टतेची ओळख करून देणे आणि अशा कार्याला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.   तसेच ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील समस्यांवर यशस्वीपणे तोडगा शोधणाऱ्या नवोन्मेषाला  प्रोत्साहन देणे हा देखील या योजनेचा उद्देश आहे.

वर्ष 2024 च्या ई गव्हर्नन्स क्षेत्रातील या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल: (i) चषक (ii) प्रमाणपत्र आणि (iii) सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या पुरस्कार विजेत्यांना 10 लाख रुपये आणि रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या पुरस्कार विजेत्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. हा निधी जिल्हा/संस्थेला लोककल्याणाच्या कोणत्याही क्षेत्रात प्रकल्प/कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा उपलब्ध संसाधनांमधील कमतरता भरून काढण्यासाठी उपयोगात आणता येईल.

यावर्षीच्या ई गव्हर्नन्स साठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये (NAeG 2024) 16 पुरस्कार प्रदान केले जातील. ज्यापैकी 10 सुवर्ण पुरस्कार असतील आणि उर्वरित 6 रौप्य पुरस्कार असतील.

यावर्षीच्या ई गव्हर्नन्स क्षेत्रातल्या या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी (NAeG, 2024) आपले नामांकन दाखल करण्यासाठी, प्रकल्प सुरू झाल्याची तारीख 01.10.2021 -30.09.2023 दरम्यान असावी आणि हा प्रकल्प 01.12.2023 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होऊन सुरू झालेला असावा.

वर्ष 2024 च्या पुरस्कारांसाठी, पाच श्रेणी करण्यात आल्या आहेत ज्या अंतर्गत ई-गव्हर्नन्स 2024 साठीचे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातील. या श्रेणी पुढील प्रमाणे आहेत (i) सरकारी कामात पुनर्अभियांत्रिकी, (ii) नागरिक केंद्रित सेवा प्रदान करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर, (iii) ई-गव्हर्नन्समधील जिल्हास्तरीय उपक्रम, (iv) शैक्षणिक आणि संशोधन संस्थांद्वारे नागरिक केंद्रित सेवांवर संशोधन आणि (v) आधुनिक तांत्रिक उपाययोजना / उपक्रमात आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव.

यावर्षीच्या ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारांसाठी (NAeG 2024) तीन श्रेणी आहेत ज्या अंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेश अर्ज करू शकतात;  2 श्रेणी आहेत  ज्या अंतर्गत केंद्रीय मंत्रालये/विभाग आणि जिल्हे अर्ज करू शकतात आणि एक श्रेणी आहे ज्या अंतर्गत शैक्षणिक/संशोधन संस्था आणि स्टार्टअप अर्ज करू शकतात.

यावेळी तीन टप्प्यात मूल्यमापन प्रक्रिया राबविली जाईल, ज्या मधील पहिले दोन टप्पे स्क्रीनिंग कमिटी अंतर्गत असतील तर अंतिम टप्प्यात ज्युरी आपला निर्णय देतील.

***

JPS/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 1984409) Visitor Counter : 166


Read this release in: English , Urdu , Hindi