पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताने केवळ स्वदेशावरच लक्ष केंद्रित केले नाही तर तो जागतिक वचनबद्धतांनाही अग्रक्रम देत आहे: केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

Posted On: 08 DEC 2023 10:52PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2023


भारत केवळ देशाच्या प्रगतीवरच लक्ष केंद्रित करत नाही, तर वर्तमान आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी एक शाश्वत जग निर्माण करण्याकरिता जागतिक वचनबद्धतानाही अग्रक्रम देत असल्याचे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज सांगितले. हे मूल्य ‘वसुधैव कुटुंबकम्’ – एक जग, एक कुटुंब, एक भविष्य या भावनेमध्ये निहित आहे जे भारताच्या हवामानविषयक कृतींना चालना देत आहे. तरुणांच्या नेतृत्वाखालील हवामान कृती आणि उपायांना चालना देण्याच्या उद्देशाने ग्रीन रायझिंगच्या उदघाटनपर कार्यक्रमाला ते संबोधित करत होते.

शाश्वत जगासाठी तरुण हे सर्वात महत्त्वाचे आहेत असे मत संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई येथे कॉप 28 मध्ये ‘द ग्रीन रायझिंग: पॉवरिंग युथ अॅक्शन अँड सोल्युशन्स फॉर क्लायमेट’ या विषयावर बोलताना मंत्र्यांनी व्यक्त केले. तरुण हा हवामान बदलाचा परिणाम झालेला गट असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, हवामानाच्या संकटाची सर्वात कमी जबाबदारी ते सहन करत असले तरी त्याचे सर्वात वाईट परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत.

तथापि, हे देखील नाकारता येणार नाही की हवामान विषयक कृतींमध्ये तरुणांचे मोलाचे योगदान आहे. ते उद्योजक, नवनिर्मिती करणारे आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याची इच्छा असलेल्या पर्यावरणाबाबत जागरूक व्यक्ती म्हणून बदलाचे प्रतिनिधी आहेत असेही मंत्र्यांनी नमूद केले.

यादव यांनी भारत ‘पर्यावरणाची बचत आणि अर्थव्यवस्थेला चालना’ या तत्त्वाने वाटचाल करत आहे यावर भर दिला आणि त्या दिशेने जागतिक पातळीवर सुरुवात होत असल्याबद्दल त्यांनी संतोष व्यक्त केला. भविष्यातील नेते म्हणून तरुणांची क्षमता बांधणी करण्याच्या उद्देशाने आणि हवामान व्यवस्थेची प्रेरक शक्ती बनवण्याच्या उद्देशाने संयुक्त उपक्रम हाती घेणे महत्वाचे आहे.

शाश्वत जीवनशैली आणि कृतींचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रातील व्यवसायांना हातमिळवणी करण्यास प्रोत्साहित केले.

ग्रीन रायझिंग या जागतिक उपक्रमाबद्दल बोलताना, यादव म्हणाले की, हे सार्वजनिक आणि खाजगी हितधारकांद्वारे विकसनशील देशांमधील किमान 10 दशलक्ष मुले आणि तरुणांना, विशेषत: मुलींना, कृती करण्यासाठी, हरित कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आणि हवामान बदलावरील देशांच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय कृती योजनांमध्ये योगदान देण्यासाठी मार्ग तयार करतात. हा उपक्रम भारत सरकारच्या युवकांच्या, देशाच्या आणि संपूर्ण जगाच्या शाश्वत प्रगतीच्या दृष्टीकोनाशी बव्हंशी सुसंगत असल्याचेही त्यांनी उद्धृत केले.


N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1984291) Visitor Counter : 100


Read this release in: English , Hindi , Telugu