संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वीरपत्नी , माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये सढळ हस्ते योगदान देण्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे जनतेला आवाहन

Posted On: 07 DEC 2023 11:05AM by PIB Mumbai

सशस्त्र सेना ध्वज दिन (एएफएफडी ) निधीमध्ये सढळ हस्ते  योगदान देऊन  वीर पत्नी , माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग होण्याचे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. 7 डिसेंबर रोजी साजरा होत  असलेल्या सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त  राजनाथ सिंह यांनी  संदेश दिला आहे. संरक्षण मंत्रालयाने  अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून , माजी सैनिक, वीरपत्नी  आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासह त्यांना पुरवण्यात येणारे सहाय्य, पुनर्वसन आणि उपचार यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी असल्याचे राजनाथ सिंह यांनी या संदेशात म्हटले आहे. . "या सगळ्यांना  आपल्या सर्वांकडून योग्य सन्मान मिळवा  हे सुनिश्चित करणे हे आमचे सामूहिक कर्तव्य आहे,"असे  ते म्हणाले.
सशस्त्र दलातले जवान  शिस्त, समर्पण आणि देशभक्तीने सीमांचे रक्षण करतात, तसेच नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी मदत आणि बचाव कार्यात तसेच जगभरातील शांतता मोहिमांमध्ये मोलाचे योगदान देतात, यावर संरक्षण मंत्र्यांनी भर दिला. मातृभूमीची  सेवा करताना  सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना त्यांनी आदरांजली वाहिली.राष्ट्राची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी अनेकांना शारीरिकदृष्ट्या अपंगत्व आले आहे अशा सैनिकांसाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. जनतेने सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये योगदान सुनिश्चित करावे आणि इतरांना या उदात्त कार्यात सहभागी  होण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या दिनाच्या निमित्ताने  संरक्षण  राज्यमंत्री  अजय भट्ट यांनीही सशस्त्र दलातील जवान , माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या शूर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी ,सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या माध्यमातून  लोकांना मिळते. जनतेने सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये योगदान देण्याचे आणि कल्याणकारी योजनांना पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

आपल्या संदेशात, संरक्षण सचिव   गिरीधर अरमाने  यांनी देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखण्यासाठी धैर्याने झटणाऱ्या शहीद वीरांना आणि संरक्षण दलातील  जवानांना अभिवादन करत  सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये सढळ हस्ते  योगदान देण्याचे आवाहन केले. सशस्त्र सेना ध्वज दिन हा  माजी सैनिक, वीर पत्नी  आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी  संरक्षण मंत्रालयाद्वारे चालवल्या जात असलेल्या कल्याणकारी उपक्रमांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करेल, अशी अपेक्षा सचिव (माजी सैनिक कल्याण)   विजय कुमार सिंह यांनी व्यक्त केली.

मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर शौर्याने लढणाऱ्या शहीद वीरांचा आणि संरक्षण दलातील  जवानांचा सन्मान करण्यासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जातो. आत्यंतिक गरज सहाय्य , मुलांच्या शिक्षणासाठी  सहाय्य , अंत्यसंस्कार सहाय्य , वैद्यकीय साहाय्य  आणि अनाथ/दिव्यांग मुलांसाठी सहाय्य  यासह  पात्र व्यक्तींच्या  वैयक्तिक गरजांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करून,  संरक्षण मंत्रालयाचा माजी सैनिक कल्याण विभाग दिव्यांगांसह  वीरपत्नी , शहीद सैनिक आणि माजी सैनिकांच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी काम करत आहे.
अलीकडेच, माजी सैनिक /कुटुंबियांसाठी  वैद्यकीय उपचार सहाय्य  रुपये 30,000 वरून 50,000 रुपये, वीरपत्नींसाठी  व्यावसायिक प्रशिक्षण सहाय्य  रुपये 20,000 वरून 50,000 रुपये आणि गंभीर आजारावरील उपचारासाठीचे  सहाय्य  1.25 लाखावरून  1.50 लाख रुपये करण्यात आले आहे. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ही मदत सशस्त्र सेना ध्वज दिन निधीतून  दिली जाते. प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 80जी (5)(vi) अंतर्गत निधीतील  योगदानासाठी  प्राप्तिकरातून  सूट देण्यात आली आहे.
2022-23 या आर्थिक वर्षात 99,000 हून अधिक लाभार्थ्यांना अंदाजे 250 कोटी रुपयांचे सहाय्य  वितरित करण्यात आले. याशिवाय पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्र , खडकी  आणि मोहाली, चेशायर होम, डेहराडून, लखनौ आणि दिल्ली आणि देशभरातील 36 युद्ध स्मृती  वसतिगृहांनाही संस्थात्मक अनुदान देण्यात आले आहे.

खालील बँक खात्यांच्या नवे काढलेल्या  धनादेश /डीडी/एनईएफटी/आरटीजीएसद्वारे निधीमध्ये योगदान दिले जाऊ शकते:

 

अनुक्रमांक          बँकेचे नाव आणि पत्ता     खाते क्रमांक                               आयएफएससी कोड

1                       पंजाब नॅशनल बँक,          3083000100179875                PUNB0308300

                         सेवा भवन, आरके पुरम

                         नवी दिल्ली-110066

2                       स्टेट बँक ऑफ इंडिया        34420400623                          SBIN0001076

                         आरके पुरम

                         नवी दिल्ली-110066


3                       आयसीआयसीआय बँक      182401001380                      ICIC0001824

                         आयडीए हाऊस, सेक्टर-4,

                         आरके पुरम

                         नवी दिल्ली-110022


खालील क्युअर  कोड स्कॅन करून देखील  सशस्त्र सेना ध्वज दिन  निधीमध्ये योगदान देता येईल. 

 

***

NM/SonalC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1983439) Visitor Counter : 152


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil