अर्थ मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी 09 डिसेंबर 2023 रोजी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) चा प्रमुख कार्यक्रम - इन्फिनिटी फोरम 2.0 च्या दुसऱ्या आवृत्तीला करणार संबोधित


फोरमची दुसरी आवृत्ती ‘GIFT-IFSCA: नव्या काळातील जागतिक वित्तीय सेवांचे मुख्य केंद्र’ या संकल्पनेवर केंद्रित

Posted On: 06 DEC 2023 8:40PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी 09 डिसेंबर 2023 रोजी वित्तीय तंत्रज्ञानासंबंधी प्रमुख कार्यक्रम - इन्फिनिटी फोरम 2.0 च्या दुसऱ्या आवृत्तीला संबोधित करतील.

 या कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) आणि GIFT City द्वारे केले जात आहे. या फोरमची पहिली आवृत्ती डिसेंबर 2021 मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि या कार्यक्रमाला 80 हून अधिक देशांमधील 95000 हून अधिक सहभागींनी नाव नोंदणी केली होती तर मुख्य कार्यक्रमासोबत 100 हून अधिक दूरदृश्य प्रणाली मार्फत उपस्थित प्रदर्शकांनी ‘फिनटेक शोकेस’ मध्ये सहभाग नोंदवला होता.

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाद्वारे या फोरमचे आयोजन वित्तीय सेवांवरील जागतिक विचार नेतृत्व व्यासपीठ म्हणून केले जाते. या फोरम मध्ये जगभरातील प्रगतीशील कल्पना, समस्यांचे तातडीने निराकरण, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शोधले जाते, त्यावर चर्चा केली जाते तसेच त्यावर उपाय आणि संधीं विकसित केल्या जातात. 

व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेत 2024 या मुख्य सोहळ्यापूर्वी प्री-कर्सर इव्हेंट म्हणून आयोजित, इन्फिनिटी फोरम 2.0 ची दुसरी आवृत्ती, हायब्रीड पद्धतीने आयोजित केली जाईल, ज्यात GIFT City मध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागींची प्रत्यक्ष उपस्थिती असेल तर जगभरातले सहभागी दूरदृश्य प्रणाली मार्फत उपस्थित राहतील. 

या कार्यक्रमाला केंद्र सरकार आणि गुजरात सरकारमधील प्रतिष्ठित नेते उपस्थित राहणार असून या वक्त्यांमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय वाणिज्य तसेच उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल; रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचा समावेश आहे.

 वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ; आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाचे अध्यक्ष के. राजारामन; गिफ्ट सिटी कंपनी लिमिटेड चे अध्यक्ष हसमुख अधिया; गिफ्ट सिटी कंपनी लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तपन रे; नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट (NaBFID) चे अध्यक्ष के. व्ही. कामत आणि कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आणि संचालक उदय कोटक हे देखील सहभागींना मार्गदर्शन करतील.

 फोरमची दुसरी आवृत्ती ‘GIFT-IFSCA: नव्या काळातील जागतिक वित्तीय सेवांचे मुख्य केंद्र’ या संकल्पनेवर केंद्रित असेल. ही आवृत्ती खालील तीन ट्रॅकद्वारे उलगडली जाईल:

  1. प्लेनरी ट्रॅक: नव्या काळातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राची निर्मिती. 
  2. ग्रीन ट्रॅक: "हरित रचने" साठी मंजुषा तयार करणे.
  3.  सिल्व्हर ट्रॅक: GIFT IFSC येथे दीर्घायुषी वित्त केंद्र. 

भारत आणि जगभरातील आर्थिक क्षेत्रातील धुरीण या मंचावर सहभागी होतील आणि विचार विनिमय करतील. तपशील पुढील प्रमाणे:

  • बालसुब्रमण्यन, एमडी आणि सीईओ, आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेड
  • अल्पेश शहा, एमडी आणि वरिष्ठ भागीदार, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप
  • अनिकेत तलाटी, अध्यक्ष, द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया
  • अनिर्बन मुखर्जी, एमडी आणि भागीदार, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप
  • अंजली बन्सल, संस्थापक भागीदार, अवाना कॅपिटल
  • अरुण कोहली, एमडी आणि कंट्री हेड, मॉर्गन स्टॅनले (भारत)
  • जी. श्रीनिवासन, माजी अध्यक्ष आणि एमडी, न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि.
  • हर्षवर्धन लुनिया, सह-संस्थापक आणि सीईओ, लेंडिंगकार्ट
  • काकू नखाते, अध्यक्ष आणि कंट्री हेड, बँक ऑफ अमेरिका, भारत
  • कुलीन लालभाई, कार्यकारी संचालक, अरविंद लि.
  • मार्गारेटा कोलान्जेलो, लाँगेविटी इकॉनॉमी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ
  • माथीआस बी. पोन्तोपीडन, संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार, पोन्तोका एडवायजरी  
  • मयंक झा, एमडी आणि भागीदार, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप
  • निखील कामत, सह संस्थापक आणि सीएफओ, झेरोधा
  • निलेश शाह, गट अध्यक्ष आणि एमडी, कोटक महिंद्रा ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ली. आणि अर्ध वेळ सदस्य, पीएम आर्थिक सल्लागार परिषद
  • नितीन जैस्वाल, परराष्ट्र संबंध प्रमुख, आशिया पॅसिफिक ब्लूमबर्ग एल. पी.
  • संजीव सन्याल, सदस्य, पीएम आर्थिक सल्लागार परिषद
  • विजय शेखर शर्मा, संस्थापक आणि सीईओ, पेटीएम (Paytm)

या कार्यक्रमापूर्वी 08 डिसेंबर 2023 रोजी फिनटेक घटकांसाठी "गुंतवणूकदारांची बैठक" आयोजित केली जाईल, जे आयएफएससीए द्वारे अधिकृत आहेत, संस्थांनी शिफारस केलेले आहेत, अथवा ज्यांनी आयएफएससीए बरोबर सामंजस्य करार केला आहे. गुंतवणूकदार परिषदेचे तपशील पुढील प्रमाणे:

फिनटेक घटकांसाठी त्यांची उत्पादने आणि उपाय प्रदर्शित करण्यासाठी सत्र, आणि सहभागी गुंतवणूकदार आणि निवड करण्यात आलेल्या फिनटेक कंपन्यांच्या प्रत्यक्ष बैठकी

या मंचावर ऑनलाइन माध्यमातून भारतातील 300 पेक्षा जास्त सीएक्सओ आणि युएसए, युके, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, युएई, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीसह 20 पेक्षा जास्त देशांमधील प्रेक्षकांच्या मोठ्या सहभागाची अपेक्षा आहे.

त्याशिवाय, या कार्यक्रमात मोठ्या जागतिक संस्थांचे सीएक्सओ, परदेशी विद्यापीठांचे कुलगुरू आणि परदेशी दूतावासांचे प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता आहे.

इन्फिनिटी फोरम 2.0 कार्यक्रम, त्याचे उद्दिष्ट आणि वक्ते याबद्दलचे पूर्ण तपशील येथे उपलब्ध आहेत:

https://www.infinityforum.in.

इन्फिनिटी फोरम 2.0 चे आयोजन आयएफएससीए आणि गिफ्ट सिटी (GIFT City) यांनी केले असून, आंतरराष्ट्रीय भागीदार म्हणून ब्लूमबर्ग; देशांतर्गत भागीदार म्हणून फिक्की (FICCI) आणि इन्व्हेस्ट इंडिया, आणि नॉलेज पार्टनर म्हणून बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप यांचे त्याला सहकार्य आहे.   

इन्फिनिटी फोरम 2.0 मध्ये दूरदृश्य प्रणाली द्वारे सहभागासाठी क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करता येईल: 

***** 


NM/S Mukhedkar/R Agashe/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1983414) Visitor Counter : 76


Read this release in: English , Urdu , Hindi