संरक्षण मंत्रालय
घाना येथे संयुक्त राष्ट्रांच्या शांती सुरक्षा मंत्रिस्तरीय बैठकीत संरक्षण राज्य मंत्री सहभागी
संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानासाठी भारताच्या पाठिंब्याची वचनबध्दता केली जाहीर
Posted On:
06 DEC 2023 7:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2023
संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी 5 ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीत घाना देशातील अक्रा येथे 2023 च्या संयुक्त राष्ट्रांच्या शांती सुरक्षा मंत्रिस्तरीय बैठकीत भाग घेतला. 06 डिसेंबर 2023 रोजी पहिल्या सत्रात त्यांनी त्यांच्या भाषणात भारताच्या वतीने एक निवेदन दिले. या निवेदनात मुख्यत्वे सध्याच्या वातावरणात शांतीरक्षकांसमोरील आव्हाने आणि शांतता कायम राखण्यात महिलांची भूमिका याविषयांचा उहापोह करण्यात आला. भट्ट यांनी भारताच्या वतीने संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेला पाठिंबा देण्याचे महत्त्वपूर्ण वचनबध्दता देखील जाहीर केली.संयुक्त राष्ट्रांच्या शांतता राखण्याच्या प्रयत्नात भारत हा सैन्य योगदान देणारा आघाडीवरचा देश आहे. गेल्या सात दशकांमध्ये, भारताने वेगवेगळ्या 53 मोहिमांमध्ये 2,75,000 हून अधिक सैनिक पाठवले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या शांती सुरक्षा मंत्रिस्तरीय बैठकीतील सहभागासोबतच संरक्षण राज्यमंत्र्यांनी परस्पर हितसंबंध आणि संरक्षण सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अनेक मित्र देशांसोबत द्विपक्षीय बैठकींमध्ये भाग घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी घानामधील अक्रा येथील भारतीय समुदायाशीही संवाद साधला.
संयुक्त राष्ट्रांची शांती सुरक्षा मंत्रिस्तरीय बैठक ही संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेली द्विवार्षिक बैठक आहे. या बैठकीत संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली शांतता कायम राखण्याच्या मोहीमांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सर्व प्रमुख देणगीदार देश तसेच सैन्य योगदान देणारे देश एकत्र येतात.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1983315)
Visitor Counter : 92