संरक्षण मंत्रालय
अखिल भारतीय कन्या सैनिक शाळा
Posted On:
04 DEC 2023 3:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 डिसेंबर 2023
उत्तर प्रदेशातील अमेठी, झाशी आणि मैनपुरी येथील तीन सैनिक शाळांसह देशातील पूर्वीच्या पद्धती नुसार स्थापन झालेल्या सर्व 33 सैनिक शाळांमध्ये मुले-मुली एकत्र शिक्षण घेतात. पूर्वीच्या पद्धती अंतर्गत फक्त मुलींसाठी सैनिक शाळा स्थापन करणे विचाराधीन नव्हते.
सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये एनजीओ/खाजगी/राज्य सरकारी शाळांसोबत भागीदारी पद्धतीने 100 नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याच्या उपक्रमांतर्गत, अखिल भारतीय कन्या सैनिक शाळा सुरू करण्यासाठी कोणतेही बंधन नाही. या संदर्भात, उत्तर प्रदेशातील मथुरा येथील संविद गुरुकुलम उच्च माध्यमिक विद्यालयाला अखिल भारतीय कन्या सैनिक शाळा म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज राज्यसभेत संगीता यादव यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1982323)
Visitor Counter : 110