संरक्षण मंत्रालय
‘बॅटल ऑफ माइंड्स’ - भारतीय सैन्य दलाची प्रश्नमंजुषा 2023 ची शानदार अंतिम फेरी दिल्लीत संपन्न
Posted On:
03 DEC 2023 7:08PM by PIB Mumbai
कारगिल युद्धातील भारताच्या विजयाचे औचित्य साधून “बॅटल ऑफ माइंड्स – इंडियन आर्मी क्विझ 2023” ह्या भारतीय सैन्य दलाच्या ऐतिहासिक कार्यक्रमाची अंतिम फेरी आज 3 डिसेंबर 2023 रोजी दिल्लीतील माणेकशॉ सेंटर येथे संपन्न झाली. चार महिने चाललेल्या या आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.देशभरातील 32,000 पेक्षा जास्त शाळांनी यात भाग घेतला, ज्यामुळे ही देशातील एक ऐतिहासिक आणि सर्वात मोठी प्रश्नमंजुषा स्पर्धा ठरली.
‘बॅटल ऑफ माइंड्स’ – इंडियन आर्मी क्विझ 2023 च्या अंतिम फेरीत वाराणसी येथील सेंट जॉन्स स्कूल बीएलडबल्यू ने विजेतेपद पटकावले.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षा अर्चना पांडे यांच्यासह विजेत्यांचा सत्कार केला. सर्व सहभागी स्पर्धकांना रोख बक्षिसे, प्रमाणपत्रे, टॅब आणि विजेत्या संघाला मिनी स्कूल बस अशा बक्षीसांचा समावेश होता.
प्रमुख पाहुणे राजीव चंद्रशेखर आणि लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी त्यांच्या भाषणात, तरुणांमध्ये बौद्धिक वाढ आणि नेतृत्वक्षमता वाढवण्यासाठी भारतीय लष्कराची वचनबद्धता अधोरेखित करत कार्यक्रमाच्या यशाबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त केला. हा कार्यक्रम हुशार तरुण विद्यार्थ्यांना लष्कराला करिअरचा पर्याय म्हणून स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देईल असेही त्यांनी सांगितले.
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1982175)