माहिती आणि प्रसारण मंत्रालय
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिले आकाशवाणीतर्फे आयोजित डॉ. राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यान
भारताची अर्थव्यवस्था,भारताप्रती जागतिक पातळीवरील आदर आणि विश्वासार्हतेत अलीकडच्या काही वर्षांत कित्येक पटींनी वाढ – उपराष्ट्रपती
Posted On:
02 DEC 2023 5:38PM by PIB Mumbai
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या स्मरणार्थ 1969 पासून दर वर्षी आकाशवाणीतर्फे आयोजित केले जाणारे डॉ. राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यान यंदा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिले. यंदाच्या व्याख्यानाचा विषय ‘आर्थिक महाशक्ती म्हणून भारताचा उदय’ असा होता.

नवी दिल्ली इथे आकाशवाणीच्या ब्रॉडकास्टिंग हाऊसमध्ये व्याख्यानासाठी जमलेल्या श्रोत्यांना राष्ट्रपतींनी सांगितले, भारताची अर्थव्यवस्था,भारताप्रती जागतिक पातळीवरील आदर आणि विश्वासार्हतेत अलीकडच्या काही वर्षांत कित्येक पटींनी वाढ झाली आहे.आज जगातील इतर देश भारताची भूमिका ऐकून घेण्यास इच्छुक आहेत, ते भारताच्या भूमिकेचा आदर करतात आणि संपूर्ण जगाने भारतीय युवावर्गाची कौशल्ये आणि अभिजात गुणांची दखल घेतली आहे. भारताच्या अध्यक्षतेखालील जी20 दरम्यान आफ्रिकी संघाला जी20चे सदस्यत्व मंजूर झाले. जगात भारताच्या विश्वासार्हतेप्रती वाढत्या आदराचा हा परिणाम असल्याचे ते म्हणाले.


दशकभरापूर्वी भारतीय अर्थव्यवस्था पाच कमकुवत अर्थव्यवस्थांपैकी एक गणली जात होती. मात्र, आजघडीला ती जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. “देशाने 140 कोटी जनता आणि कार्यक्षम नेतृत्वाच्या आधारे हे यश प्राप्त केले आहे. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला आहे. सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा आणि डिजिटल अर्थव्यवहारात भारताने उल्लेखनीय यश मिळवले आहे.”

भारतीय युवावर्गात देशाच्या अमृतकाळात देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याची ताकद असल्याचे अधोरेखित करून धनखड म्हणाले की जागतिक नेतृत्व म्हणून भारताचा पुनश्च उदय तेव्हाच शक्य होईल जेव्हा प्रत्येक भारतीय आपापली कर्तव्यांची पूर्तता करेल.
उपराष्ट्रपतींचे संपूर्ण व्याख्यान - here.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा हे स्वागतापर भाषणात म्हणाले की राष्ट्रपतीपद हे स्वतंत्र व पक्षांतर्गत राजकारणाच्या पलीकडे जाणारे असावे, या पदाबाबत पक्षाभिनिवेश असू नये, असे डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आपल्याला शिकवले. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करत आजही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल ही संविधानात्मक पदे राजकारणाबाहेर ठेवलेली आहेत, असेही ते म्हणाले.
***
N.Chitale/R.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1981972)
Visitor Counter : 261