संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण  मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे 40 व्या कोस्ट गार्ड कमांडर्स परिषदेचे उद्घाटन


भारतीय तटरक्षक दलाला भारताच्या किनारपट्टी संरक्षण आणि सागरी क्षमतांना बळ देण्यासाठी समर्पण आणि व्यावसायिकतेसह कार्य करत राहण्याचे आवाहन

प्रविष्टि तिथि: 30 NOV 2023 2:35PM by PIB Mumbai

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय तटरक्षक दलाला (आयसीजी ) देशाच्या किनारपट्टी संरक्षण आणि सागरी क्षमतांना बळ देण्यासाठी समर्पण आणि व्यावसायिकतेने कार्य करत राहण्याचे आवाहन केले आहे. आज 30 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे 40 व्या कोस्ट गार्ड कमांडर्स परिषदेचे उद्घाटन करताना, संरक्षण  मंत्री यांनी शोध आणि बचाव आणि प्रदूषण प्रतिसादाच्या क्षेत्रात अग्रेसर राहून भारताची सागरी सुरक्षितता  सुनिश्चित केल्याबद्दल  भारतीय तटरक्षक दलाची प्रशंसा केली.

भारतीय तटरक्षक दलाने, त्याच्या स्थापनेपासून, वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांचे संरक्षण आणि सुरक्षितता सुनिश्चित करून खलाशांना चांगली सेवा दिली आहे,” असे राजनाथ सिंह म्हणाले. दारूबंदी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध मोहीम सुरू ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

परिषदेदरम्यान, संरक्षण  मंत्री यांना महासंचालक राकेश पाल यांनी चालू असलेल्या विकास प्रकल्प, कारवाईची तयारी आणि  भारतीय तटरक्षक दलाच्या भविष्यातील विस्तार योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. या तीन दिवसीय परिषदेचे उद्दिष्ट समकालीन सागरी आव्हानांना सामोरे जाणे आणि देशाच्या किनारपट्टीवर पाळत ठेवण्याची यंत्रणा मजबूत करणे हे आहे. यात संरक्षण मंत्रालय आणि  भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

परिषदेच्या अजेंडामध्ये सागरी संरक्षण आणि सुसंरक्षण वाढवणे, उदाहरणार्थ शोध आणि बचाव कार्य, सागरी प्रदूषण प्रतिसाद, प्रतिबंधित/अमली पदार्थांच्या तस्करी विरुद्ध मोहीम, समुद्रातील मच्छिमार/नागरी यांची सुसंरक्षण, किनारपट्टी सुसंरक्षण उपायांना अनुकूल करणे, आंतरसंवर्धन करणे,संस्थात्मक समन्वय आणि सागरी कार्यक्षेत्रविषयक जागरूकतेला प्रोत्साहन देणे यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे.

ही परिषद दरवर्षी आयोजित केली जाते. परिषदेत सहभागी सर्व अधिकारी भविष्यासाठी आराखड्याची आखणी करतात आणि विविध धोरण आणि रणनीतीविषयक  मुद्द्यांवर चर्चा करतात. राष्ट्राच्या  सेवेसाठी भविष्यवादी दृष्टीकोन तयार करणे आणि विविध आव्हानांवर कार्यक्षमतेने मात करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.

***

R.Aghor/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1981168) आगंतुक पटल : 121
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , English , Urdu , हिन्दी