रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उत्तरकाशी बोगदा बचाव मोहीमेबाबत माध्यमांना माहिती- 28.11.2023

Posted On: 28 NOV 2023 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर 2023

बचाव कार्याबाबत महत्वाची अद्ययावत माहिती :

1. एनचआयडीसीएलचे जीवनरक्षणासाठीचे प्रयत्न:

  • ताजे शिजवलेले अन्न आणि ताजी फळे ठराविक अंतराने दुसऱ्या लाईफ लाइन (150 मिमी व्यास) सेवेचा वापर करून बोगद्याच्या आत पोहोचवली जात आहेत.
  • एसडीआरएफने उपलब्ध मनुष्यबळासह व्हिडिओ संप्रेषण स्थापित केले आहे आणि एनडीआरएफने थेट लाईन संपर्क स्थापित केला आहे.

2. एनएचआयडीसीएल द्वारे हॉरीझॉन्टल बोरिंग (आडवे खोदकाम)

  • आतापर्यंत एकूण 58 मीटर पर्यंत पाईप आत ढकलण्यात आला आहे.

3.सतलज जल विद्युत निगम- द्वारे बचावासाठी व्हर्टिकल ड्रिलिंग (उभे खोदकाम) (1.0 मीटर व्यास):

  • ड्रिलिंग काम सुरू झाले असून वार्तांकनाच्या वेळेपर्यंत 45 मीटर चे काम पूर्ण झाले.

4.टीएचडीसीएल द्वारे बरकोट बाजूला आडवे ड्रिलिंग:

  • टीएचडीसी ने बरकोट बाजूला बचाव बोगद्याचे बांधकाम सुरू केले आहे.
  • 28.11.2023 रोजी 0500 वाजता सातवा स्फोट करण्यात आला.
  • बोगद्याची एकूण निष्पादित लांबी 13.20 मीटर आहे. पुढे, खोदकाम सुरु आहे.
  • 18 रीब्सच्या फॅब्रिकेशनचे काम पूर्ण झाले आहे.

5.आरव्हीएनएल द्वारे लंब-क्षैतिज ड्रिलिंग:

  • मजुरांना वाचवण्यासाठी आडव्या ड्रिलिंगसाठी आवश्यक असलेल्या सूक्ष्म बोगद्यासाठी लागणारी उपकरणे नाशिक आणि दिल्लीहून घटनास्थळी पोहोचली आहेत.
  • प्लॅटफॉर्म बनवण्याचे काम पूर्ण झाले आहे. मजबुतीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.

6.सिल्क्यरा टोकाला आरव्हीएनएल द्वारे उभे ड्रिलिंग (8 इंच व्यास):

  • बीआरओ ने 1150 मीटरचा प्रवेश रस्ता पूर्ण केला आहे आणि आरव्हीएनएल ला सुपूर्द केला आहे. ड्रिलिंगसाठी बीआरओ ने घटनास्थळी मशीन आणले.
  • आरव्हीएनएल ला विद्युत जोडणी प्रदान करण्यात आली आहे.
  • उभ्या ड्रिलिंगसाठी प्लॅटफॉर्म पूर्ण झाला आहे.
  • 26.11.2023 रोजी 0400 वाजता ड्रिलिंग सुरू झाले आणि 72 मीटर काम पूर्ण झाले.

7.ओएनजीसी द्वारे बरकोट टोकाकडे उभे ड्रिलिंग (24 इंच व्यास).

  • ओएनजीसी ने पुरवलेली एअर हॅमर ड्रिलिंग रिगची सर्व संबंधित सामग्री ऋषिकेश येथे पोहोचली आहे, कारण ड्रिलिंगसाठी रिग ठेवण्यासाठी बीआरओ द्वारे मार्ग आणि जागा तयार केली जात आहे.

8.टीएचडीसीएल/लष्कर/कोल इंडिया आणि एनएचआयडीसीएल च्या संयुक्त टीमद्वारे मॅन्युअल-सेमी मेकॅनाइज्ड पद्धतीने ड्रिफ्ट टनेल:

  • 22 फ्रेम्स तयार करण्यात आल्या आहेत.

 

G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1980526) Visitor Counter : 90


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia