आदिवासी विकास मंत्रालय
आदिवासी व्यवहार मंत्रालयाने साजरा केला, संविधान दिन, 2023
जनजातीय गौरव उत्सवाच्या समारोपाचा भाग म्हणून,आदिवासी संशोधन संस्था (NTRI) ने आयोजित केला संविधान दिन कार्यक्रम
Posted On:
26 NOV 2023 8:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2023
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आज संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ तसेच राज्यघटनाकारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचे ऋण मान्य करण्यासाठी, हा दिवस देशभरात पाळला जातो.
नवी दिल्लीत आदिवासी व्यवहार मंत्रालयात झालेल्या एका समारंभात, आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे सचिव, श्री अनिल कुमार झा यांच्या नेतृत्वाखाली, प्रस्तावना वाचन झाले. मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव श्रीमती. आर जया, संयुक्त सचिव ब्रिज नंदन प्रसाद आणि मंत्रालयाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
आज राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळा (NSTFDC)ची विभागीय कार्यालये आणि भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघा (TRIFED) च्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये देखील प्रस्तावनेचे वाचन आयोजित करण्यात आले होते.
दुसऱ्या एका कार्यक्रमात, राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था (NTRI), नवी दिल्ली यांनी, जनजातीय गौरव उत्सवाच्या संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
जनजातीय गौरव उत्सवाच्या (15 - 26 नोव्हेंबर, 2023) समारोपाचा भाग म्हणून नवी दिल्लीच्या आदिवासी संशोधन संस्था (NTRI) ने संविधान दिन कार्यक्रम आयोजित केला.
G.Chippalkatti/A.Save/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1980016)
Visitor Counter : 117