माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फी 54 मध्ये मोरोक्कन चित्रपट "फेझ समर' 55" चा आशियाई प्रीमियर
चित्रपटात एका लहान मुलाच्या नजरेतून मोरोक्कोच्या स्वातंत्र्यलढ्याचे चित्रण केले आहे: दिग्दर्शक अब्देलहाई लारकी
गोवा/मुंबई, 25 नोव्हेंबर 2023
फेझ समर’ 55 मध्ये मोरक्कन स्वातंत्र्यलढ्याचे लहान मुलाच्या नजरेतून चित्रण करण्यात आले आहे असे दिग्दर्शक अब्देलहाई लारकी यांनी आज गोव्यात 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिनिधी आणि माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. या चित्रपटाचा इफ्फी 54 मध्ये आशियाई प्रीमियर झाला आणि तो अरबी आणि फ्रेंच भाषेत बनवण्यात आला आहे.
फेझ समर' 55 हे एक राजकीय नाट्य आहे जे 1955 च्या उन्हाळ्यात मोरोक्कोच्या स्वातंत्र्याच्या संघर्षाच्या गोंधळात टाकणाऱ्या घटनांचा शोध घेते. 'मदिना ऑफ फेझ' चा 11 वर्षांचा मुलगा कमल, मोरोक्कोच्या स्वातंत्र्यापूर्वीचे शेवटचे महिने अनुभवत आहे. आयचा आणि तिच्या काराओइयिन विद्यापीठातील सहकारी विद्यार्थ्यांच्या संपर्कात, तो स्वातंत्र्याच्या लढ्याची माहिती मिळवतो आणि त्यात भाग घेतो.
दिग्दर्शक अब्देलहाई लारकी यांना संवेदनशील चित्रपटांसाठी ओळखले जाते. समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी त्यांच्या चित्रपटांची प्रशंसा केली आहे.
त्यांच्या चित्रपटांतून दिसणारा समान धागा हा इतिहास, सत्ता आणि धर्म यांच्याशी लोकांच्या संबंधांचे प्रतिबिंब असते. फेज समर'55 मोरोक्कन स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर या विषयांचा शोध घेतो. फ्रेंचने कासाब्लांका येथे मोरोक्कन राष्ट्रवादींना फाशी दिल्यावर या संघर्षाने हिंसक वळण घेतले होते.
चित्रपटाच्या प्रेरणेबद्दल बोलताना, लारकी यांनी हा चित्रपट त्याच्या हृदयाच्या किती जवळ आहे हे स्पष्ट केले. ते म्हणाले , “माझा जन्म फेझच्या याच मदिना येथे झाला, मी शेजारच्या शहरात लहानाचा मोठा झालो जे चित्रपटप्रेमी होते”. त्यांना मोरोक्कन इतिहासाचा एक छोटासा भाग पुन्हा तयार करायचा होता आणि त्यांची कथा समजून घेण्यासाठी वास्तविक जीवनातील लढवय्या सैनिकांची त्यांनी मुलाखत घेतली. “त्यापैकी एकाने मला एक किस्सा सांगितला – लहानपणी त्याने या लढ्यात कसा भाग घेतला होता. हाच तो क्षण होता जेव्हा मला समजले या विषयाकडे मुलाच्या नजरेतून कसे पाहायचे ” असे त्यांनी सांगितले. मोरोक्कोच्या स्वातंत्र्याच्या सर्वोच्च ध्येयासाठी विचारधारा निवडणाऱ्या निष्पाप मुलामध्ये आपल्याला अधिक रस असल्याचे लारकी यांनी सांगितले.
त्यांच्या मते, फेझ मदीना (मदीना म्हणजे अरबी भाषेत शहर) हे स्वतःच चित्रपटातील एक पात्र आहे. यात छत हे एक लक्षणीय वैशिष्ट्य आहे, कारण ते छतावर राहणाऱ्या मोरोक्कन महिला आणि मुलांचे जीवन आणि खाली काळोख्या गल्लीतील फ्रेंच वसाहतवादी आणि स्वातंत्र्यसैनिक यांच्या जीवनातील फरक दाखवते. फेझचे रहिवासी ते जिवंत बनवतात. यात ओळख एक संकल्पना म्हणून सादर करताना त्यांनी मोरोक्को आणि वसाहती असलेल्या जगातील सर्व ठिकाणांसाठी एक रूपक म्हणून, फेज खुले आकाश असलेली बंदिस्त जागा म्हणून प्रस्तुत केली आहे.
दिग्दर्शकाला असेही वाटते की ही संकल्पना आजच्या काळात अधिक प्रासंगिक आहे जेव्हा आपण पूर्वीच्या वसाहती देशांमधील नव-वसाहतवादावर नव्याने चर्चा करत आहोत. "गाझामध्ये आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे" असे ते म्हणाले. 11 वर्षांचा मुलगा देखील त्याच प्रकारे एक प्रतीक आहे - आजच्या मोरोक्कोचे प्रतीक आहे जे त्याच्या खऱ्या स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करत आहे असे ते पुढे म्हणाले.
पत्रकार परिषद येथे पहा:
* * *
PIB Mumbai |N.Meshram/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979937)
Visitor Counter : 91