माहिती आणि प्रसारण मंत्रालय
'द फिशरमन्स डॉटर' मतभेदांच्या कोलाहलात समानता शोधण्याचा प्रयत्न करतो : दिग्दर्शक एदगार डी लुक जेकोम
गोवा/मुंबई, 25 नोव्हेंबर 2023
'द फिशरमन्स डॉटर' या चित्रपटाचे दिग्दर्शक एदगार डी लुक जेकोम म्हणाले की "आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या वागण्यात आणि जगण्याच्या पद्धतीबाबत मतभेद आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला माणूस म्हणून समानतेचे धागे सापडू शकतात आणि तेच मी माझ्या चित्रपटातून शोधण्याचा प्रयत्न करत आहे. या चित्रपटात एका मच्छीमाराची कथा आहे ज्याचे कणखर व्यक्तिमत्व आहे आणि दुरावलेल्या मुलीशी त्याची झालेली भेट याचे चित्रण आहे. 54 व्या इफ्फीच्या निमित्ताने चित्रपट दिग्दर्शकाने आज पत्रकारांशी संवाद साधला.
मच्छीमार वडील आणि त्याची दुरावलेली मुलगी पुन्हा एका निर्जन बेटावर भेटतात आणि ते त्यांच्या त्रासदायक भूतकाळ आणि वर्तमानाशी जुळवून घेतात. माध्यमांशी संवाद साधताना,एदगार यांनी चित्रपट निर्मितीप्रति त्यांचे दृष्टिकोन आणि त्यांच्या सिनेमॅटिक कल्पनाशक्तीला चालना देणारे घटक देखील सामायिक केले. त्यांनी सांगितले की त्यांचे आजोबा एक मच्छीमार होते आणि त्यांचे जीवन या चित्रपटासाठी प्रेरक ठरले.
या चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले, "पर्यटन, बंदरे आणि इमारतींमुळे सांता मार्ताचे मच्छिमार विस्थापित झाले आणि त्याचप्रमाणे ट्रान्स समाजालाही हलविण्यात आले. या चित्रपटाची कल्पना या दोन्ही समुदायांना एका कथेत जोडणे आणि एकत्र आणणे ही आहे".
'द फिशरमन्स डॉटर' या चित्रपटाद्वारे एदगार र डी लुके जेकोम पदार्पण करत आहे आणि मच्छीमार आणि ट्रान्स समुदाय या दोघांचा अनोखा दृष्टीकोन यात पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
दिग्दर्शकाबद्दल थोडेसे :
एदगर डी लुके जेकोमचा लघुपट सिन रेग्रेसो (2007) बियारिट्झ आणि सॅंटियागो येथील महोत्सवांमध्ये होता. त्याने युनिव्हर्सिडॅड डेल नॉर्टे येथे कम्युनिकेशन्समध्ये प्रावीण्य मिळवले आणि रॉबर्टो फ्लोरेस प्रिएटो यांच्या रुइडो रोसा (2014) आणि लिबिया स्टेला गोमेझ यांच्या एला (2015) मध्ये ते सहाय्यक दिग्दर्शक होते. त्याच्या तीन पटकथांसाठी एफडीसीचे पटकथालेखन उत्तेजनपर पुरस्कार त्यांनी पटकावला आहे. ते अनेक वर्षे युनिव्हर्सिडॅड डेल मॅग्डालेना येथे प्राध्यापक होते.
संपूर्ण संवाद येथे पहा :
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979805)
Visitor Counter : 99