माहिती आणि प्रसारण मंत्रालय

घरगुती हिंसाचाराने ग्रासलेल्या जगात 'हॉफमन्स फेअरी टेल्स' सिनेमा आशेचा किरण जागवण्याचा प्रयत्न करतो: टीना बरकालय


54व्या इफ्फीमध्ये ‘सुवर्ण मयूर’साठी रशियन चित्रपट 'हॉफमन्स फेयरी टेल्स' स्पर्धेत

Posted On: 24 NOV 2023 6:53PM by PIB Mumbai

हॉफमन्स फेयरी टेल्स हा रशियन भाषेतील चित्रपट असून टीना बरकालया यांचे दिग्दर्शन आणि पटकथा आहे. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर रशियामधील अशांत काळात, नादेझदा या मुलीच्या जीवनाचे चित्रण केले आहे. गोव्यात सुरू असलेल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी स्पर्धा करत आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मार्गारीटा ग्रॅचेवा यांच्यावर झालेल्या क्रूर हल्ल्याची घटना टीना बारकलाया यांनी सामायिक केली. टीना यांनी सांगितले की - ग्रेचेवा या रशियन महिलेचे दोन्ही हात तिच्याशी दुर्व्यवहार करणाऱ्या तिच्या पतीने कापले होते. टीना बरकालया यांनी निदर्शनास आणले की 21व्या शतकातही, प्रत्येक देशात घरगुती हिंसाचार होतच आहे, मग तो भारत असो, जॉर्जिया असो किंवा रशिया असो. “ही कथा एक परीकथा असावी असे मला वाटत होते कारण  परीकथांचा शेवट नेहमी आनंददायी होतो.” चित्रपटाची कल्पना आणि तो बनवण्याचा उद्देश याबाबत टीना बरकालया म्हणाल्या की, घरगुती हिंसाचाराने ग्रासलेल्या या जगात, तिचा चित्रपट आशेचा किरण दाखवण्याचा प्रयत्न करतो. “या चित्रपटातील नायिकेचे नाव नादेझदा आहे आणि रशियन भाषेत या शब्दाचा अर्थ ‘आशा’ असा आहे आणि हा योगायोग नाही. चित्रपटातली मुख्य नायिका एक लायब्रेरियन आहे जी ग्राहकांना दिलेल्या प्रत्येक पुस्तकात नेहमीच एक बुकमार्क टाकत असते आणि बुकमार्कचे शीर्षक देखील असते - आशेचा किरण  परत आणा”, असे त्यांनी सांगितले.
 

दिग्दर्शक म्हणून आपल्यात झालेल्या बदलाबद्दल बोलताना, टीना बारकालया म्हणाल्या की लघुपट आणि सांगीतिक व्हिडिओमधील त्यांच्या अनुभवाने त्यांना चित्रपट निर्मितीमध्ये जलद आणि प्रभावीपणे कसे काम करावे हे शिकवले. “माझ्यासाठी दृश्यात्मक पैलू खूप महत्त्वाचा आहे. जाहिरातींच्या माझ्या कामाचा मला फायदा झाला. मला वाटते  की सिनेमा नक्षीकामासारखा असतो”, सिनेमांमध्ये संगीत आणि पार्श्वसंगीत महत्त्वाचे असले तरी काही वेळा शांतता देखील अधिक प्रभावी ठरू शकते असे  त्या म्हणाल्या.

सारांश:

याची कथा 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला घडताना दाखवली आहे. सोव्हिएत युग पाश्चात्य देशाची नकल करत असताना, चित्रपटात नादेझदा ही  व्हिटालीशी विवाहबंधनात अडकलेली एक भित्री  स्त्री आहे आणि अपार्टमेंटसाठी तो तिचे शोषण करत असतो. दोन नोकऱ्या करत असलेली नादेझदा हिचे जीवन बदलते, जेव्हा एका कोटचा मालक तिचे सुंदर, सर्जनशील हात पाहतो. तिचे जीवन नाट्यमयरित्या बदलते आणि ती एक लोकप्रिय हँड मॉडेल म्हणून उदयाला येते.

हा संवाद येथे पाहता येईल :

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

Shilpa P/Sushama K/CYadav



(Release ID: 1979669) Visitor Counter : 91


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu