माहिती आणि प्रसारण मंत्रालय
विकसित भारत संकल्प यात्रा गोव्याच्या ग्रामीण पंचायत भागात
शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिक ,शासकीय विभागातल्या प्रतिनिधींसोबत स्थानिक नागरिकांचा संवाद अशा उपक्रमांचे आयोजन
Posted On:
24 NOV 2023 9:07PM by PIB Mumbai
मुंबई /गोवा, 24 नोव्हेंबर 2023
गोव्याच्या विविध भागात विकसित भारत संकल्प यात्रा माहिती शिक्षण आणि संवाद (आयईसी) व्हॅन पोहोचत आहेत. केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची नागरिकांना माहिती व्हावी, त्यांना योजनांच्या तरतुदींची माहिती मिळावी आणि यासाठी अटी व शर्तीनुसार लाभार्थी म्हणून त्यांची नोंदणी व्हावी, यासाठी हे अभियान देशभर राबवले जात आहे.
डिचोली आणि मयें मतदारसंघातील पंचायत भागात माहिती प्रसार मोहीम सुरू आहे. आयईसी व्हॅन परिसरात पोहोचल्यावर कारापूर-सर्वण पंचायतीतील कारापूर येथे सावंत सभागृहात कार्यक्रम झाला. मयेंचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य महेश सावंत, सरपंच दत्तप्रसाद साखरदांडे, पंचायत सदस्य, शासकीय अधिकारी आदींनी उत्साही ग्रामस्थांच्या उपस्थितीत व्हॅनचे स्वागत केले. याप्रसंगी आरोग्य विभागातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
विकसित भारत संकल्प यात्रा अभियानाचा एक भाग म्हणून आज दक्षिण गोव्यातील कोळवा नावेली ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात 14 सरकारी विभाग आणि संस्थांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. यात त्यांनी नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. यासाठी आज 100 हून अधिक स्थानिक नागरिक उपस्थित होते. कॅव्हेलोसिम आणि कार्मोना ऑर्लिम इथल्या दोन स्वयं-सहायता गटांनी सरकारी कल्याणकारी योजनांबाबत दोन माहितीपूर्ण नाटिका सादर केल्या. खते आणि कीटकनाशकांच्या फवारणीचे ड्रोन प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आले.
G.Chippalkatti/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979633)
Visitor Counter : 96