संरक्षण मंत्रालय
पुनर्वसन महासंचालनालयाने माजी सैनिकांसाठी आयोजित केला रोजगार मेळावा
एकूण 1,326 रिक्त पदांवर नियुक्ती करण्यासाठी 33 कॉर्पोरेट कंपन्यांचा रोजगार मेळाव्यात सहभाग
Posted On:
23 NOV 2023 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2023
निवृत्ती पश्चात रोजगाराच्या शोधात असलेले माजी सैनिक आणि रोजगार प्रदात्यांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्यासाठी, संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील पुनर्वसन महासंचालनालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाने 23 नोव्हेंबर 2023 रोजी गुरुग्राम मध्ये दुंदहेरा मिलिटरी स्टेशन येथे रोजगार परिषद/ मेळाव्याचे आयोजन केले होते. या उपक्रमाला हरयाणा, दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमधील माजी सैनिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. एकूण 1,326 पदांवर नियुक्ती करण्यासाठी सुमारे 33 कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यात भाग घेतला. लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या जवळजवळ 1,200 माजी सैनिकांनी यावेळी रोजगारासाठी नोंदणी केली. पुढल्या महिन्यात चंदीगड आणि विशाखापट्टणम येथे आणखी दोन रोजगार मेळावे होणार आहेत. निवड झालेल्या माजी सैनिकांना वरिष्ठ पर्यवेक्षक, मध्यम/वरिष्ठ स्तरावरील व्यवस्थापक, इथपासून ते स्ट्रॅटेजिक प्लॅनर आणि प्रकल्प संचालक यासारख्या विविध पदांवर नियुक्तीचा लाभ दिला जाईल.
कॉर्पोरेट कंपन्या आणि निवृत्त सैनिक, दोघांसाठी हा उपक्रम फायदेशीर ठरला. निवृत्त सैनिकांना सेवेत असताना प्राप्त केलेले तांत्रिक आणि प्रशासकीय कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले, तर अनुभवी, शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित व्यक्तींना नियुक्त करून कॉर्पोरेट् कंपन्यांनाही लाभ मिळाला. या रोजगार मेळाव्यात कॉर्पोरेट कंपन्यांनी विविध उद्योजकता मॉडेल्स सादर केली.
R.Aghor/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979225)
Visitor Counter : 95