गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वच्छ भारत मिशन- शहरी 2.0 अंतर्गत शहरांमधील स्वच्छता, यांत्रिक मैला सफाई आणि वापरलेल्या पाण्याच्या व्यवस्थापनावर भर दिला जाणार


गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने चेन्नई आणि तामिळनाडू इथे 23 आणि 24 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित केली राष्ट्रीय कार्यशाळा

Posted On: 23 NOV 2023 7:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2023

जागतिक शौचालय दिन 2023 च्या निमित्ताने गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालय (एमओएचयुए) 19 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर 2023 या काळात स्वच्छ शौचालय मोहीम राबवत आहे. सार्वजनिक आणि वस्ती पातळीवरील शौचालयांचे परिचालन प्रभावी करण्यासाठी आणि त्याच्या शाश्वत भविष्यासाठी, सर्व सार्वजनिक आणि वस्ती पातळीवरील शौचालयांची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी हा 5 आठवड्यांचा उपक्रम राबवला जात आहे.

स्वच्छता, सहज उपलब्धता, अभिनव संरचना, तसेच कार्यक्षमतेचे उदाहरण ठरतील, अशी मॉडेल सार्वजनिक शौचालये ओळखण्याच्या उद्देशाने, स्वच्छ शौचालये चॅलेंज (आव्हान) सुरू करण्यात आले आहे.

पुढील टप्प्यात, शहरांना स्वच्छता, यांत्रिक मैला व्यवस्थापन आणि वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करता यावे, या दृष्टीने स्वच्छ भारत मिशन- शहरी 2.0 (SBM-U 2.0) अंतर्गत चेन्नई आणि तामिळनाडू येथे 23 आणि 24 नोव्हेंबर 2023 रोजी याबाबतचे नियोजन आणि अंमलबजावणी धोरणावर चर्चा करण्यासाठी 2 दिवसीय राष्ट्रीय क्षमता विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

2014 मध्ये सुरू झाल्यापासून, स्वच्छ भारत मिशनने जागतिक स्तरावर स्वच्छता पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणली आहे. टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये स्वच्छता, यांत्रिक मैला व्यवस्थापन आणि युडब्ल्यूएम ला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करून, स्वच्छ भारत मिशन- शहरी 2.0 ने प्रभावी व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी नवोन्मेष, प्रशासन, तसेच लहान शहरांनी संरचना आणि अंमलबजावणीमध्ये चक्राकार अर्थव्यवस्थेचा दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली आहे. 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पाचगणी, पाटण, कऱ्हाड आणि इतर काही शहरांनी स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनामध्ये आदर्श प्रस्थापित केला आहे.

कचरा विलगीकरणात मदत करणाऱ्या पाचगणीतील स्वच्छाग्रहींपासून ते कचरा पॉइंटला एक सुंदर हिल स्टेशन बनवण्यापर्यंत, पाचगणीसारख्या छोट्या शहरांनी सर्वांगीण स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले आहे. स्वच्छ भारत मिशन- शहरी 2.0  अंतर्गत, 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये सर्व प्रकारच्या द्रव कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत लागू करण्यात आलेल्या नवीन पद्धतीनुसार, शहरातील सर्व सांडपाणी सुरक्षितपणे साठवले जाईल, गोळा केले केले जाईल, त्याची वाहतूक केली जाईल आणि त्यावर प्रक्रिया केली जाईल, जेणेकरून शहरातील सांडपाणी जलस्रोतांना प्रदूषित करणार नाही.

S.Kakade/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1979211) Visitor Counter : 132


Read this release in: English , Urdu , Hindi , Malayalam