कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘कर्मयोगी प्रारंभ’ चा पहिला वर्धापन दिन साजरा

प्रविष्टि तिथि: 22 NOV 2023 5:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  22 नोव्हेंबर 2022 रोजी  सुरू केलेल्या कर्मयोगी भारतने  (कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग)   आज कर्मयोगी प्रारंभचा  पहिला वर्धापन दिन साजरा केला. यानिमित्त  रोजगार मेळाव्याद्वारे भरती झालेल्या सर्व नवीन सरकारी नियुक्त्यांसाठी आयजीओटी कर्मयोगी मंचावर ऑनलाइन अभिमुखता कार्यक्रम राबविण्‍यात आला.

सर्व रोजगार मेळावाच्या माध्यमातून  नियुक्त कर्मचाऱ्यांना  सरकारी धोरणांशी जुळवून घेण्यासाठी  आणि त्यांना नवीन भूमिकांमध्ये सहजतेने संक्रमण होण्यास मदत करण्याच्या दृष्टीने   आठ अभ्यासक्रमांचा संच कर्मयोगी प्रारंभ कार्यक्रमात समाविष्ट आहे.

यावेळी बोलताना, कर्मयोगी भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अभिषेक सिंह  यांनी कर्मयोगी प्रारंभ  कार्यक्रमाच्या माध्यमातून  आत्मविश्वासपूर्ण नवीन सरकारी अधिकारी म्हणून संक्रमण करणाऱ्या नव्याने  नियुक्ती केलेल्या  कर्मचाऱ्यांचे  अभिनंदन केले.

आयजीओटी मंचावर  सरकारी विभागातील  26 लाखांहून अधिकजण शिक्षण घेणारे   नोंदणीकृत आहेत. त्यांच्यासाठी   815+ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून समाविष्ट असलेले प्रारंभ  अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत: 1) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता, 2) कामाच्या ठिकाणी महिलांचा  लैंगिक छळापासून बचाव, 3)प्रेरक हेतू समजून घेणे, 4) स्व-नेतृत्व, 5) तणावाचे  व्यवस्थापन, 6) प्रभावी संवाद , 7) नवशिकावूंसाठी एमएस वर्ड आणि 8) नवशिकावूंसाठी एमएस एक्सेल.

S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1978821) आगंतुक पटल : 124
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi